शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे इयत्ता नववीत प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी

 

शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता जवाहर नवोदय विद्यालय, लातूर

येथे इयत्ता नववीत प्रवेश  घेण्याची सुवर्ण संधी

           लातूर, दि.7(जिमाका) :- भारत सरकारच्या शिक्षण विभागाअंतर्गत संपूर्ण आर्थिक साहायाने  नवोदय विद्यालय समिती या स्वायत्तयंत्रणे मार्फत मुला-मुलींसाठी निवासी स्वरुपाच्या प्रत्येक जिल्ह्यात एक या प्रमाणे जवाहर नवोदय चालविण्यात येत आहे. जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववीत जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षाव्दारे गुणवत्तेनुसार  रिक्त जागांसाठी  प्रवेश  देण्यात येतो. 

नवोदय विद्यालय समितीच्या नवीन मार्गदर्शक नियमाप्रमाणे जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे इयत्ता नववी मध्ये  शैक्षणिक वर्ष  2023-24 प्रवेशासाठी  दि. 11 फेब्रुवारी  2023 रोजी घेण्यात येणाऱ्या  निवड चाचणी परिक्षेकरिता ऑन लाईन पध्दतीने लातूर जिल्ह्यात  सध्या आठवीत शिक्षण घेत असलेल्या संबंधीत विद्यार्थ्याच्या  पालकांकडून  अर्ज मागविण्यात येत आहे.

            सदरील ऑनलाईन प्रवेश अर्ज नवोदय विद्यालय समितीच्या www.navodaya.gov.in  या किंवा www.nvsadmissionclassnine.in  या वेबसाईटवर माहितीसाठी तसेच ऑनलाईन प्रवेश  अर्ज  भरण्यासाची दिनांक 2 सप्टेंबर, 2022 उपलब्ध आहे. सर्व माहितीसह ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम  दि  15 ऑक्टोबर,  2022 आहे. परीक्षेचे ॲडमिट कार्ड  (Admit Card)  संबंधीत पालकांना व उमेदवारांना परीक्षेपूर्वी वरील वेबसाइटवरून डाउनलोड करुन घेता येईल.

              प्रवेशा  परिक्षे करीता पात्रता नियम व अटी:- शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये लातूर जिल्ह्यातील शासनमान्य शाळेत इयत्ता आठवीत शिकत असणारे विद्यार्थीच सदर प्रवेश चाचणी परीक्षेसाठी पात्र राहतील. प्रवेश परीक्षा देणा-या विद्यार्थीचा जन्म दि. 1 मे 2008 पूर्वी  व 30 एप्रिल, 2010 नंतर झालेला नसावा. ही अट सर्व राखीव गटासाठी सुध्दा लागू राहील.

          सर्व संबंधीत पालक, विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक, शिक्षकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या पाल्याचा / विदयार्थ्याचा ऑनलाईन अर्ज भरतांना नवोदय विद्यालय समितीव्दारे प्रसिध्द केलेल्या माहितीपत्रकातील परीक्षे संबंधीच्या सर्व नियम व अटीचे, मार्गदर्शक नियमाचे संपूर्ण अध्ययन करावे व त्यानुसार ऑनलार्इ्रन अर्ज भरावा. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,अधिक माहितीसाठी विद्यालयाचे प्रवेश परीक्षा प्रभारी बी.डी.शेख भ्रमणध्वनी क्र. 9817834930 किंवा  व्ही. एच. खिल्लारे भ्रमणध्वनी क्र.9860568840 यांचेशी  संपर्क साधावा  असे आवाहन , जवाहर नवोदय विद्यालय, लातूरचे प्राचार्य  आर आर रामू  यांनी  एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                               0000

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु