युवा उत्सवात जिल्हयातील युवकांनी सहभाग घ्यावा जिल्हा युवा अधिकारी यांचे आवाहन
युवा
उत्सवात जिल्हयातील युवकांनी सहभाग घ्यावा
जिल्हा युवा अधिकारी यांचे आवाहन
*लातूर, दि.11(जिमाका)* भारतीय स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवानिमित्त युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत
नेहरु "युवा केन्द्र संगठनमार्फत संपूर्ण देशभरात युवा उत्सवाचे आयोजन करण्यात
येत आहे. ग्रामीण भागातील युवकांच्या कलागुणांना देशपातळीवर व्यासपीठ उपलब्ध व्हावे
या उद्देशाने युवा कलाकार चित्रकला स्पर्धा, युवा लेखक कविता स्पर्धा, मोबाईल फोटोग्राफी
स्पर्धा, भाषण स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत लोकनृत्य स्पर्धा, युवा संवाद भारत
@ 2047 कार्यक्रम आदीचे आयोजन करण्यात येत आहे.
लातुर
जिल्हयात नेहरू युवा केन्द्र व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने
लातूर जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन दिनांक 14 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 9-00 ते
सायंकाळी 6-00 या कालावधीत करण्यात आला आहे.
सदरील
स्पर्धेत जिल्हयाभरातील 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवकांना सहभाग घेता येईल. स्पर्धेसाठी
फक्त लातुर जिल्ह्यातील युवकांना भाग घेता येईल.
युवा
कलाकार पेंटिंग स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये 1 हजार, द्वितीय रुपये 750/- , तृतीय
पारितोषिक 500/- , युवा लेखक कविता लेखन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये 1 हजार,
द्वितीय रुपये 750/- , तृतीय पारितोषिक 500/- , मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा प्रथम पारितोषिक
रुपये 1 हजार, द्वितीय रुपये 750/- , तृतीय पारितोषिक 500/- , भाषण स्पर्धा प्रथम पारितोषिक
रुपये 5 हजार, द्वितीय रुपये 2 हजार, तृतीय पारितोषिक रुपये 1 हजार, सांस्कृतिक –समुह
नृत्य स्पर्धा पारितोषिक रुपये 5 हजार, द्वितीय
रुपये 2 हजार 500, तृतीय पारितोषिक रुपये 1 हजार 250 तर युवा संवाद स्पर्धेसाठी चार
उत्कृष्ठ संवादक युवकांना प्रत्येकी रुपये 1 हजार 500 स्पर्धानिहाय बक्षीसाचे स्वरुप
असणार आहे.
पेन्टिंग,
कविता लेखन व भाषण स्पर्धेसाठी व युवा संवाद साठी विकसित भारत का लक्ष्य हा विषय असुन
स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार स्वरुपात रोख पारीतोषीक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
देवुन सन्मानीत करण्यात येईल.
जिल्हास्तरीय
स्पर्धेतील विजेत्यांना राज्यस्तरीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीय
पातळीवरील स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेकांनी स्पर्धास्थळी दिनांक 14 ऑक्टोबर,
2022 रोजी सकाळी 9-00 वाजेपर्यन्त उपस्थित राहणे आवश्यक आहे. उशीरा आलेल्या स्पर्धकांना
कुठल्याही सबबीवर स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.
स्पर्धेत
भाग घेण्यासाठी https://forms.gle/ibF32r96Rb6QZsE18 या ऑनलाईन लिंकवर फॉर्म उपलब्ध
आहे. इच्छुक स्पर्धकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरता येईल. अर्जासोबत आधारकार्डची
झेरॉक्स लावणे आवश्यक आहे. तरी सदरील युवा उत्सवात जिल्हयातील जास्तीत - जास्त युवकांनी
सहभाग घ्यावा तसेच अधिक माहीतीसाठी मोबाईल कंमाक 9823322895, व 7838628657 व संपर्क
करावा असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया यांनी केली आहे.
****
Comments
Post a Comment