खाजगी वाहतूकदारांनी अधिक भाडे आकारल्यास होणार कारवाई

 

लातूर, दि.21 (जिमाका):- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत खाजगी वाहतूकदारांनी निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास त्यांच्यावर तरतूदीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त आणि जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहेत.

                 त्याअनुषंगाने राज्यमार्ग परिवहन महामंडळाने त्या-त्या संवर्गातील वाहनांसाठी भाडेदर निश्चीत केला आहे. सद्य:स्थितीचे भाडेदर विचारात घेवून खाजगी बसेससाठी प्रती कि.मी.भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने दि.27 जुलै 2018 ला निश्चित केले आहेत. त्यानुसार शासन निर्णयाप्रमाणे कंत्राटी परवाना वाहनाचे प्रती बस, प्रती कि.मी., प्रती आसन कमाल भाडे (रा.प.मंडळाचे भाडे अधिक 50 टक्के धरुन) मार्गदर्शक भाडेदर पुढीलप्रमाणे आहेत.

लातूर ते मुंबईपर्यंत साध्या बसचे प्रवाशी भाडे 790 रुपयेनिमआराम किंवा शयनआसनी बससाठी एक हजार 70 रुपयेवातानुकूलित शिवशाही आसनी बससाठी एक हजार 170 रुपये आणि वातानुकूलित शयनयान बससाठी एक हजार 265 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. लातूर ते पुणे व नगरपर्यंत साध्या बसचे प्रवाशी भाडे 550 रुपयेनिमआराम किंवा शयनआसनी बससाठी 745 रुपयेवातानुकूलित शिवशाही आसनी बससाठी 815 रुपये आणि वातानुकूलित शयनयान बससाठी 880 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

लातूर ते कोल्हापूरपर्यंत साध्या बसचे प्रवाशी भाडे 625 रुपयेनिमआराम किंवा शयनआसनी बससाठी 850 रुपयेवातानुकूलित शिवशाही आसनी बससाठी 930 रुपये आणि वातानुकूलित शयनयान बससाठी एक हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. लातूर ते नागपूरपर्यंत साध्या बसचे प्रवाशी भाडे 825 रुपयेनिमआराम किंवा शयनआसनी बससाठी एक हजार 125 रुपयेवातानुकूलित शिवशाही आसनी बससाठी एक हजार 225 रुपये आणि वातानुकूलित शयनयान बससाठी एक हजार 325 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

लातूर ते औरंगाबादपर्यंत साध्या बसचे प्रवाशी भाडे 460 रुपयेनिमआराम किंवा शयनआसनी बससाठी 625 रुपयेवातानुकूलित शिवशाही आसनी बससाठी 685 रुपये आणि वातानुकूलित शयनयान बससाठी 740 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. लातूर ते जळगावपर्यंत साध्या बसचे प्रवाशी भाडे 720 रुपयेनिमआराम किंवा शयनआसनी बससाठी 980 रुपयेवातानुकूलित शिवशाही आसनी बससाठी एक हजार 70 रुपये आणि वातानुकूलित शयनयान बससाठी एक हजार 140 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

               याबाबत प्रवाशांची काही तक्रार असल्यास दिनांक 22 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत नोडल ऑफीसर मोटार वाहन निरीक्षक ए. एल. जाधव (संपर्क क्र. 9823217625) यांच्याशीतर दिनांक 25 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत सचिन बंग (संपर्क क्र. 9923346642) यांच्याशी संपर्क करावा. नागरिकांना dyrto.24-mh@gov.in./ dycommr.enf2@gmail.com या ई-मेल आयडीवर तसेच 9699403776 या व्हाटसअप क्रमांकावर तक्रार नोंदविता यईल. तक्रार नोंदविताना पुरावा म्हणून प्रवाशाने त्यांच्याकडील तिकिटाची प्रत सोबत जोडणे आवश्यक आहेअसे लातूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.


Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा