“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव”निमित्य आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्य आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा

§  *1 हजार 67 पदासाठी रोजगार मेळावा: लातूर, औरंगाबाद, पुणे जिल्ह्यातील 14 आस्थापना, उद्योजक रोजगार देणार*

§  *येत्या 15ऑक्टोंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औसा, जि. लातूर येथे सकाळी 10-00 वाजता आयोजन.*

 

            *लातूर, दि.12(जिमाका):-* जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र लातूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औसा व मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्रद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्य आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दि. 15ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औसा, जि. लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यासाठी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  

            या मेळाव्यात रोजगार देणारे उद्योजक हे लातूर, औरंगाबाद, पुणे, जिल्हयातील एकूण 11 आस्थापना / उद्योजक यांनी एकूण 1 हजार 67 रिक्त पदे अधिसुचित केली आहेत.

प्रमूख आस्थापना, उद्योजक पूढील प्रमाणे  १) EDUVANT AGE GROUP PUNE, २) VISHWA GROUP  LATUR,  ३) INDURANCE TECH PVT LTD AURANGABAD,  ४) LIC of India,  ५) MAHANAND GRPUP MIDC LATUR,  ६) YASHASWI ACADEMY FOR SKILL CHINCHWAD PUNE, ७)  BADVE ENGINEERING LTD AURNGABAD,  ८) RUCHA ENGINEERS PVT.LTD , ९) NIIT LTD ( ICICI Bank),  १०) DAREKAR EVENTS PVT LTD. LATUR, ११)  IDFC FIRST BHARAT LTD  12) DOMINOS PIZZA LATUR 13) VARROC ENGNEERING LTD DECCAN MANAGEMENT CONSUTANT FINISHING AURNGABAD 14) EQUINOX TECHNOLOGIEST LATUR या नामांकीत कंपन्यांनी रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. यासाठी दहावी, बारावी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, एमबीए, आय.टी.आय., डिप्लोमा इत्यादी शैक्षणिक पात्रतेसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

वरील सर्व नामांकीत कंपनीतील उद्योजकांची रिक्त पदे निहाय इच्छूक उमेदवारांनी दिनांक १५ ऑक्टोंबर  2022 रोजी सकाळी 10.00 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औसा, जि.लातूर येथे स्वखर्चाने मुलाखती करीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे स्वत:चा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे. या सुवर्णसंधीचा लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त लातूर यांनी केले आहे.

अधिक माहिती करिता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, लातूर या कार्यालयाच्या 02382- 299462 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु