विविध मॅट्रिकपुर्व ‍शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर डिबीटी (DBT)* *23 हजार 104 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अदा*

 

*विविध मॅट्रिकपुर्व ‍शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर डिबीटी (DBT)*

*23 हजार 104 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अदा*

*लातूर,दि.14(जिमाका):-*  समाज कल्याण विभाग,जिल्हा परीषद, लातूर या कार्यालयामार्फत भारत सरकार मॅट्रिकपुर्व ‍शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले ‍शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायातील मुलांना ‍शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता ‍शिष्यवृत्ती व इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना परिक्षा फी माफी योजनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमूक्त जाती, भटक्या जमाती,विशेष मागस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उपरोक्त योजनांचा लाभ देण्यात येतो. सन 2019-2020 पासून इतर मागास प्रवर्ग व तसेच विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपुर्व ‍शिष्यवृत्ती व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना  सावित्रीबाई फुले ‍शिष्यवृत्ती देण्यास सुरु करण्यात आले असल्याने  उपरोक्त प्रमाणे 12 शिष्यवृत्ती या कार्यालयाकडून देण्यात येत आहेत.

          सदर योजनेचे उद्दिष्ट हे ‍विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहान देणे तथा गरजू विद्यार्थ्यांना लेखन शैक्षिनिक साहित्य खरेदी करण्यासाठी प्रोत्साहान देणे, हा  आहे. 

          महाराष्ट्र शासनाकडून सेवा पंधरवाडा दिनांक 17 सप्टेंबर, 2022 ते दि. 2 ऑक्टोबर, 2022 आयोजन करण्यात आलेले होत. त्यात विविध मॅट्रिकपुर्व ‍शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर डिबीटी (DBT) जमा करण्यात करण्यात येत असून यात 23 हजार 104 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अदा करण्यात येत आहे.

         शैक्षणिक वर्षे  सन 2022-23 करीता सर्व मागास प्रवर्गातील पात्र विदयार्थ्यांनी बँक खाते क्र. उघडून सदर योजनेचा लाभ  घेण्याचे आवाहन प्रशासक  तथा जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी,  अभिनव गोयल  यांनी केलेले आहे. यामध्ये काही अडचणी आल्यास जिल्हा समाज कल्याण विभाग, जि.प., लातूर यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. प्रभू जाधव  यांनी केले आहे.‍

              चालू शैक्षणिक वर्षे  सन 2022-23 या  वर्षातील सर्व पात्र मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संकलान करण्यासाठी तालूकास्तरीय  एक दिवसीय शिबीराचे आयोजन दिवाळीनंतर करण्यात येणार असून यासाठी सर्व मुख्याध्यापक यांनी  आवश्यक आधार संलग्न बँके खाते क्र. व तत्सम आवश्यक माहीती विदयार्थ्याकडून संकलीत करुन परिपुर्ण प्रस्ताव विहीत नमुन्यात  गट शिक्षण अधिकारी यांचे प्रति स्वाक्षरीसह हार्ड व सॉफ्ट कॉपीसह शाळास्तवर तयार करावेत.

तसेच   सर्व पात्र मागासवर्गीय प्रवर्गाती विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी शाळा / बीट स्तरावर शिबीराचे आयोजन करावयाचे असल्याने याबाबत पुर्वतयारी शाळास्तारवर  करण्याबाबत सुचना  जिल्हा समाज कल्याण अधिकारी   सुनिल खमितकर  यांनी कलेल्या आहे.                

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा