राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात 21 नविन परिवर्तन बसेस दाखल उपाध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते उद्घाटन.

 राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात

 21 नविन परिवर्तन बसेस दाखल

उपाध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते उद्घाटन.

        


लातूर,दि. 21 (जिमाका)-
 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  शेखर चन्ने यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील अंबेजोगाई रोडवरील बसस्थानक क्रमांक दोन येथे 21 नविन परिवर्तन बसेसचे उद्घाटन झाले. या बसमध्ये आरामदायी पुशबॅक सीट आहेत. लवकरच या बसेस टप्प्याटप्प्याने विभागातील विविध मार्गावर धावणार आहेत.

           या बसेसचा प्रवास सर्व सवलतीधारकांनाही लागू आहे. या आरामदायी, सुखकर व सुरक्षित बसेस साध्या दरात धावणार असून या बसेसचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. चन्ने यांनी केले.

         


लातूर विभागाचे विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी लातूर विभागात दाखल झालेल्या 21 नविन परीवर्तन आरामदायी बसेस प्रवासी गर्दी असलेल्या परभणी, उस्मानाबाद, उदगीर, सोलापुर व अंबेजोगाई या विविध मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी सोडणार असल्याचे सांगितले.

               कार्यक्रमास वरीष्ठ सांख्यिकी अधिकारी (नियंत्रण समिती क्र 02) बद्रिप्रसाद मांटे, विभागीय यंत्र अभियंता सेवाराम हेडाऊ, विभागीय वाहतुक अधिकारी अभय देशमुख, विभागीय वाहतुक अधिक्षक संदिप साळुंके, सुरक्षा व दक्षता अधिकारी दिपक धात्रक, कामगार अधिकारी प्रदिप सुतार, उपयंत्र अभियंता जफर कुरेशी तसेच विभागातील अधिकारी, कर्मचारी व विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

                                                                          ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु