मुलीचे शासकीय वसतिगृह सावेवाडी येथे मुलींचा गुणगौरव व पालक मेळावा संपन्न

 

मुलीचे शासकीय वसतिगृह सावेवाडी येथे

मुलींचा गुणगौरव व पालक मेळावा संपन्न

 

          *लातूर दि.1(जिमाका):-*  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर अंतर्गत गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सावेवाडी लातूर येथे यशस्वी मुलींचा गुणगौरव पालक मेळावा प्रादेशिक उपायुक्त अविनाशजी देवसटवार व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवकांतजी चिकुर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 28सप्टेंबर,2022 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाला गृहपाल श्रीमती वर्षा चौधरी, आदर्श मंत्री फाउंडेशन चे संस्थापक संतोष बिराजदार प्रख्यात व्याख्याते व इतिहासकार, प्रा.  विवेक सौताडेकर व पत्रकार  राजकुमार काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

              प्राजक्ता गरड, मनीषा कसबे, निकिता पालनले अभिरुचा डोळस रोशनी मस्के यांनी वसतीगृहातील विविध समित्यांची माहीती वसतीगृहामध्ये होणा या सर्व उपक्रमाचा व वसतिगृहाबाबत आपली मते सविस्तरपणे व्यक्त केली.

           या वसतिगृहातून अनेक विद्यार्थीनींनी उत्तूंग भरारी घेऊन यश संपादन केल्याचे गृहपाल श्रीमती वर्षा चौधरी यानी व्यक्त केले.

         यावेळी पालकांनी सुध्दा गृहपाल श्रीमती वर्षा चौधरी यांचा सन्मान केला. आझादी का अमृत महोत्सवानिमीत्त घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेत वैष्णवी बनसोड व रोशनी, मस्के यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता त्या बददल सन्मान पत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. मुलीचे पालकत्व मुलींच्या जबाबदा-या मुलीना येणा-या अडचणी या सर्वावर मात कशी करायची याची सविस्तर माहीती वर्षा चौधरी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. पाल्याच्या प्रगतीबाबत उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त केले.

           यावेळी श्रीमती शिवानंदा परोडवाड, श्रीमती गंगा गायकवाड व वसतीगृहातील सर्व कर्मचारी सर्व मुली पालक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाचपडे निकिता, सुषमा डोंगरे यानी तर आभार प्रदर्शन सोनाक्षी कावळे यांनी केले

                                                         




 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु