लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील माथाडी, हमाल कामगारांना 2 कोटी 9 लाख रुपये दिवाळी बोहणी, पगारी रजा रक्कमेचे वाटप
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील माथाडी, हमाल कामगारांना
2 कोटी 9 लाख रुपये दिवाळी बोहणी, पगारी रजा रक्कमेचे वाटप
लातूर, दि.20 (जिमाका)- सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयांतर्गत लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळात कामगारांना नोंदणीकृत करण्यात येते. दोन्ही जिल्ह्यातील दोन हजार 750 नोंदणीकृत हमाल कामगारांना दिवाळी बोहणी म्हणून दोन कोटी 90 लाख रुपयांचे वाटप करण्यात आलेले आहेत.
दिवाळी बोहणी व पगारी रजेच्या वाटपात मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले, सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे, कार्मिक अधिकारी मिलिंद राजेंद्र, लेखापाल बस्वराज खानापुरे, सहाय्यक लेखापाल वामन जाधव, वरीष्ठ लिपीक गुलाब राठोड, काकासाहेब देडे, भिमाशकंर गुळवे, नितीन देशमुख यांनी कामकाज पहिले.
****
Comments
Post a Comment