वैद्यकीय दंतचिकित्सा व शल्यचिकित्सा शिबीर संपन्न

 

वैद्यकीय दंतचिकित्सा व शल्यचिकित्सा शिबीर संपन्न

            *लातूर, दि.10(जिमाका):-* दि. 3 ते 7 ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत सामान्य रुग्णालय उदगीर येथे आयुक्त यांच्या आदेशानुसार व आरोग्य सेवा परिमंडळ उपसंचालक व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय दंतचिकित्सा व शल्यचिकित्सा शिबीर घेण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन आरोग्य सेवा परिमंडळ लातुर उपसंचालक श्रीमती डॉ. कमल चामले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

                 उद्घाटन समारंभास उदगीर उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी व उदगीर तहसीलदार रामेश्वर गोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच वैद्यकिय अधिक्षक इत्तात्रय पवार, अति. जि.श.चिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे , निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. मोनिका पाटिल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे, डॉ संजय बिरादार, अनम महिंद्रकर, विजया गुरुडे, दो महेश अर्दाले डॉ. नागेश स्वामी, डॉ राणीदेवी पवार डॉ.मल्लीकार्जुन बिरादार, डॉ.डि.र.भोसले व इतर वैद्यकिय अधिकारी व सहाय्यक अधिसेविका श्रीमती मानकोळे, सार्वजनिक आरोग्य परिचर, सर्व परिसेविका व इतर कर्मचारी उपस्थित होते.         दि. ३ व ४ ऑक्टोंबर,2022 या दोन दिवसात शिबीरात आलेल्या सर्व १ हजार ३०२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये खालीलप्रमाणे विभागवार रुग्ण तपासण्यात आले.

                 मेडिसीन-९९, त्वचारोग-२१,बालरोग- २८९, शस्त्रक्रिया-73, कान, नाक, घसा- 52, अस्थिरोग- 41-स्त्रीरोग-55, दंतरोग-202, मनोरुग्ण-33, नेत्ररोग-111, इतर-326 .

                 रुग्ण तपासणी कामी हृदयविकार तज्ञ डॉ. कोतवडे , भिषक डॉ. दाचावार, स्त्रीरोग तज्ञ डॉ. इगवे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. विश्वनाथ डांगे, त्वचारोग तज्ञ डॉ.गौतमी विर , मानसोपचार तज्ञ डॉ. तळीखेडकर , क्ष-किरण तज्ञ डॉ. सचिन कांडगिरे या खाजगी वैद्यकिय व्यवसायीकांचे सहकार्य मिळाले.

                 तपासणी करून शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांची यादी तयार करण्यात आली. या दोन दिवसात पोषण आहार, असंसार्गिक आजार, मानसिक आजार, आर्श (ARSH), पीसीपीएनडीटीसीपी (PCPNDT NTCP) याविषयीचे प्रदर्शन, मार्गदर्शन १२५ लोकांचे समुपदेशन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

                 दि. ६ व ७ ऑक्टोबर,2022 रोजी शस्त्रक्रिया पात्र रुग्णांच्या खालीलप्रमाणे शस्त्रक्रिया करण्यात आल्या या मध्ये  हार्निया-03, अपेंडिक्स-01, हायड्रोसिल-09, फिमोसिस-01, व्हेरिकोसिल-01,  लायपोमा-03, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया-02, सिझेरियन-02 अशा एकूण २२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी १८ शस्त्रक्रिया डॉ. शशिकांत देशपांडे ( अति वे.) यांनी केल्या व ४ शस्त्रक्रिया स्वीरोग तज्ञ डॉ. मृत्युंजय बंगे यांनी केल्या. तसेच डॉ. मळभा करे मॅडम, डॉ. बावधाने मॅडम व डॉ. माचनवाड यांनी भुलतज्ञ म्हणून काम पाहिले. श्रीमती साब रिसेविका व इतर कर्मचारी यांनी वैद्यकिय सेवा दिली. दंतविभागात एकुण २०२ रुग्णांवर खालीलप्रमाणे उपचार करण्यात आले.

                 दात काढणे-43, दाताची फिलिंग करणे-58, दात साफ करणे-44, पीट अॅन्ड फिशर फिलंट-54, लघुशस्त्रक्रिया-03 यामध्ये डॉ.बालकुंदे, डॉ.स्मिता वंजे, डॉ. वाघमारे, डॉ. सोनकांबळ, डॉ. राठोड, डॉ. येरोळकर यांनी कामकाज पाहिले. ग्रामीण भागातील रुग्णांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना शिबीराचा लाभ घेण्यासाठी पाठविणे कामी कापसे ( तालुका आरोग्य अधिकारी) यांचे सहकार्य मिळाले. शिवीर यशस्वीतेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकाचे सहकार्य मिळाले.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु