महिलांना कर्करोग संदर्भातील प्राथमिक लक्षणे व उपचारासाठी लातूर येथे कर्करोग निदान व उपचारासाठी संजीवनी अभियान

 

महिलांना कर्करोग संदर्भातील प्राथमिक लक्षणे व

उपचारासाठी लातूर येथे कर्करोग निदान व उपचारासाठी संजीवनी अभियान

 

       *लातूर दि.3(जिमाका):-* बदलती जीवनशैलीमुळे महिलांमधील कर्करोगा सारख्या आजाराचे प्रमाण वाढताना दिसून येते. यात स्तनाचा कर्करोग व गर्भाशयमुखाचा कर्करोग हा प्राधान्याने महत्त्वाचा व प्रतिबंध करता येणे सारखा कर्करोग आहे, यावर वेळेत जाणीव जागत्रती व्हावी, महिलांना कर्करोग संदर्भातील प्राथमिक लक्षणे सांगुन वेळेत उपचार व्हावा यासाठी मराठवाडा मुक्ती संग्रामच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात संजीवनी अभियानाची सुरुवात करण्यात आली. यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील आशा, आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत संजीवनी अभियानाचा पहिला टप्पा (सर्व्हेक्षण) चा पुर्ण करण्यात आला.

   हा कालावधी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून 30 सप्टेंबर पर्यंत पुर्ण केला. यात घरोघरी जावून 30 वर्षावरील सर्व महिलाना गर्भाशयमुख व स्तनाच्या कर्करोगाच्या प्राथमिक लक्षणांची माहिती गोळा करण्यात आली. यात 3 लाख 42 हजार महिलांची माहिती संकलीत करुन 825 स्तनाच्या कर्करोग व 3 हजार 958 हे गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी संशयीत संख्या काढण्यात आली.

यानंतर संजीवनी अभियानाचा दुसरा टप्पा (निदान) हा ऑक्टोबर महिन्यापासून राबविण्यात येणार असून यात तालुका पातळीवर वै़कीय महाविद्यालय, स्त्रीरोग संघटना, सर्व ग्रामीण  उपजिल्हा रुग्णालयातील तज्ञांच्या मदतीने निदानाची शिबीरे आयोजीत करण्यात येणार आहेत. यात कर्करोग निदान होणाऱ्या रुग्णांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना, वैद्यकीय महाविद्यालय व इतर काही ठिकाणी उपचारासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचा अभियानाचा उद्देश आहे.

   या अभियानाचा आढावा हा आज दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,  मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी घेतला.

 यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे एच.व्ही., जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, सर्व जिल्हास्तरीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक उपस्थित होते. यावेळी डॉ. अर्चना पंडगे, सहाय्यक  जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याचे सादरीकरण केले.

                                                000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा