आंबिया बहार 2022 करीता जिल्ह्यातील द्राक्ष, केळी, पपई,डाळिंब, आंबा या फळ पिकासाठी विमा योजना लागू

 

आंबिया बहार 2022 करीता जिल्ह्यातील द्राक्ष, केळी, पपई,डाळिंब, आंबा

या फळ पिकासाठी विमा योजना लागू

 

               *लातूर दि.4(जिमाका):-* आंबिया बहार 2022 मध्ये द्राक्ष, केळी, डाळिंब, आंबा व पपई या पिकासाठी पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना लातूर जिल्हृयामध्ये अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळामध्ये राबविण्यात येत आहे.

              सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशीलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. जिल्हृयामध्ये सदर योजना एच.डी.एफ.सी. अर्गो जनरल इन्शूरन्स कपंनी मुंबई या विमा कंपनी मार्फत कार्यान्वीत केली जात आहे.

          जिल्ह्यातील अधिसूचित फळपिके व महसूल मंडळ पूढील प्रमाणे आहे.- तालूका लातूर द्राक्ष- लागू नाही, आंबा- सर्व महसूल मंडळे, केळी लागू नाही, डाळिंब- तांदूळजा, मुरुड, पपई-लागू नाही.औसा- औसा,लामजना, किल्लारी, किनीथोट, भादा व बेलकुंङ आंबा- सर्व महसुल मंडळे, केळी- किल्लारी, मातोळा, डाळिंब- औसा, लामजना, किनीथोट, किल्लारी, भादा, बेलकुंड,उजनी. पपई- उजनी, निलंगा- द्राक्ष- निलंगा, औराद श., अंबूलगा, कासार बालकूंदा, आंबा-सर्व महसूल मंडळे, केळी – लागू नाही, डाळिंब-निलंगा, औराद श.पपई- लागू नाही, रेणापूर-द्राक्ष- कारेपूर, आंबा- सर्व महसूल मंडळे, केळी- लागू नाही, डाळिंब- कारेपूर,पपई- लागू नाही. शिरुर अनंतपाळ- द्राक्ष-लागू नाही, आंबा- सर्व महसूल मंडळे, केळी- लागू नाही, डाळिंब- लागू नाही, पपई- लागू. उदगीर- द्राक्ष- मोघादेवर्जन, आंबा- सर्व महसूल मंडळे, केळी- लागू नाही, डाळिंब-नागलगाव,हेर पपई-देवर्जन.अहमदपूर- द्राक्ष-लागू नाही, आंबा-सर्व महसूल मंडळे, केळी- लागू नाही, डाळिंब-अहमदपूर, पपई-हाडोळती. चाकूर- नळेगाव, शेळगाव, आंबा- महसूल मंडळे, केळी- लागू नाही, डाळिंब-चाकूर,नळेगाव,वडवळ  ना. पपई-लागू नाही,जळकोट-द्राक्ष-लागू नाही, आंबा- महसूल मंडळे, केळी- लागू नाही, डाळिंब-लागू नाही,पपई-लागू नाही.देवणी- द्राक्ष-लागू नाही, आंबा-सर्व महसुल मंडळे, केळी-लागू नाही,डाळिंब- लागू नाही,पपई- लागू नाही.

        अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर, 2022 विमा संरक्षित रक्कम 320000/- विमा संरक्षित रक्कम-31 डिसेंबर,2022-140000/-  31 ऑक्टोबर-2022-140000/- 14 जानेवारी 2023-130000/- 31 ऑक्टोबर 2022- 35000/-  शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्ता- 15 ऑक्टोबर 2022-16000/- 31 डिसेंबर 2022-7000/- 31 ऑक्टोबर 2022-7000/- 14 जानेवारी 2023-6500/- 31 ऑक्टोबर 2022- 1750/- असा आहे.

             कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सदर योजना ऐच्छिक असुन कर्जदार शेतक-यांना सदर योजनेत भाग घेणे अथवा न घेणे बाबत संबंधित बॅकेकडे विहित नमुन्यात घोषणापत्र व अर्ज सदर करावा लागेल अर्ज केला नसल्यास आपली समती आहे असे गृहीत धरुन बॅकेमार्फत आपला विमा हप्ता कपात करण्यात येईल.

               बिगर कर्जदार शेतक-यांनी विहीत मुदतीत बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे ऑनलाईन फळपिक विमापोर्टल www.pmfby.gov.in वर सहभाग नोंदवावा. (त्यासाठी अर्जदाराने आपल्या अर्जासोबत आधारकार्ड / आधार नोंदणी प्रत, जमिनधारक सातबारा, 8 () उतारा व फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, भाडेपट्टा करार असलेल्या शेतक-यांच्या करारनामा/सहमतीपत्र, आणि बॅक पासबुक प्रत सादर करुन प्रत्यक्ष ईलेक्ट्रानिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे.)

            अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनी जिल्हा प्रतिनिधी श्री. आविनाश खेडकर (मो. क्र.8888436054)  यांच्याकडे संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी  एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                                   ****

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा