शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थी व महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा होण्यासाठी दिलेल्या कारणांची पूर्तता करावी
शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थी व महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा होण्यासाठी दिलेल्या कारणांची पूर्तता करावी लातूर,दि.30(जिमाका)- सन २०१८-१९ व २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची व महाविद्यालयाची शिष्यवृत्ती अद्याप बॅंक खातेवर जमा न झालेल्या कारणांसह यादी महाविद्यालयास देण्यात आली आहे तसेच महाविद्यालय लॉगीन मध्येही आहे. तरी महाविद्यालयानी सदर विद्यार्थ्यांशी तात्काळ संपर्क साधुन दिलेल्या कारणांची योग्य ती पुर्तता तात्काळ करण्यात यावी अन्यथा सदर विद्यार्थी व महाविद्यालयाची शिष्यवृत्तीची रक्कम जमा न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदरी महाविद्यालयाची व विद्यार्थ्यांची राहील ,असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे. जिल्हयातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित /कायम विनाअनुदानित महाविदयालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती , विमुक्त जाती भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थी यांना कळविण्यात येते की , सन 2018-19 य...