1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

 

1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

 

लातूर,दि.1(जिमाका):- मा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली व मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांचे निर्देशानुसार दि. 01 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षीप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला असुन त्यानुसार दिनांक  01 ते दि. 30 नोव्हेबर 2021 या कालवधीत दावे व हरकती स्विकारणार आहे. तसेच दावे व हरकती कशा पध्दतीने स्विकारावे यासंबंधी सविस्तर प्रशिक्षण नायब तहसिलदार (निवडणूक) कुलदीप देशमुख यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांना देण्यात आलेले आहे त्याचे फोटो यासोबत सलग्न करण्यात आलेले आहे.

तरी लातूर तालुक्यातील सर्व नागरीकांना / मतदारांना आवाहन करण्यात येते की, ज्यांचे नाव मतदार यादीत नाहीत व ज्यांचे वय दि. 01 जानेवारी, 2022 रोजी 18 किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांनी दि. 01 ते दि.30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच ज्या मतदारांचे नाव दुरुस्ती करावयाचे आहे किंवा ठिकाण / पत्ता बदलावयाचे आहे तसेच मयत व कायम स्थलांतरीत झाल्यामुळे मतदार यादीतील नावाची वगळणी करावयाचे आहे त्यांनी योग्य तो नमुना अर्ज ऑलनालाईन स्वरुपात WWW.NVSP.IN या संकेतस्थवावर किंवा VOTER HELPLINE APP  च्या माध्यमातून अर्ज सादर करावे, तसेच अपवादात्मक परिस्थीतीत वरील सर्व अर्ज हस्तलिखित स्वरुपात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मार्फत सुध्दा स्विकारले जातील.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत मतदारांना प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्जाचे संगणीकरण करणे सोयीचे होणार आहे. तरी भारत निवडणूक आयोगाचे ऑनलाईन दावे व हरकती सादर करण्यासाठी WWW.NVSP.IN या संकेतस्थवावर किंवा VOTER HELPLINE APP मध्ये सुविधा उपलब्ध् आहे. या सुविधांचा जास्तीत जास्त व प्रभावीपणे वापर करुन ऑनलाईन अर्ज करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनील यादव, तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी स्पनील पवार यांनी केले आहे.

 

                                              ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा