नगर भूमापन झालेल्या शहरांचे / गावांचे मिळकत पत्रिकांची उतारे ऑनलाईन उपलब्ध
नगर भूमापन
झालेल्या शहरांचे / गावांचे
मिळकत पत्रिकांची
उतारे ऑनलाईन उपलब्ध
लातूर,दि.26
(जिमाका) :- लातूर शहरातील व जिल्ह्यातील इतर
गावातील जेथे गावठाण भुमापन झालेले आहे, अशा गावठाणांमधील मिळकत पत्रिकांसाठी आता नागरिकांना
उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयात मिळकत पत्रिकांच्या उताऱ्यासाठी येण्याची आवश्यकता
नाही. ईज ऑफ डुइंग बिजनेस अंतर्गत भुमी अभिलेख विभागत ई-पीक प्रकल्प राबविण्यात आला
असून त्याअतंर्गत लातूर जिल्ह्यातील लातूर शहरासह जिल्ह्यातील एकूण 152 गावांच्या 1
लाख 29 हजार 852 मिळकत पत्रिकांचे डिजीटल सिग्नेचर झाले असून या डिजीटाईज मिळकत पत्रिकांचे
उतारे नागरिकांना आता ऑनलाईन https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळावर
पाहण्यासाठी तसेच त्याचे उतारे घेण्यसाठी उपलब्ध आहेत.
मिळकत पत्रिकांचे उतारे घेण्यासाठी आता
नागरिकांना कार्यालयात येण्याची व अर्ज देण्याची आवश्यकता नाही. https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळावर
विहीत शुल्क भरणा करुन त्यांचे उतारे नागरिकांना घरीच घेता येणार आहे. तसेच सेतु केंद्रावरही
उपलब्ध होतील. सध्याच्या कोविड-19 च्या काहात यामुळे नागरिकांना याचा मोठा लाभ होणार
आहे.
मिळकत पत्रिकांची नक्कल घेणे कामी आता नगर भुमापन कार्यालय किंवा उप अधिक्षक , भुमी अभिनलेख
कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. तसेच अर्ज करण्याची सुध्दा आवश्यकता नाही. आपण
कोणत्याही ठिकाणी मिळकत पत्रिकांची नक्कल एका क्लिकवर हस्तगत करुन घेवू शकता. महाभुलेख
संकेस्थळ https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr वरुन डिजीटल
स्वाक्षरी झालेले संगणीकृत मिळकत पत्रिकांची नक्कल नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात
आली आहे.
नागरिकांनी फेरफारसाठी नगर भूमापन कार्यालय
किंवा उप अधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयात अर्ज सादर केल्यानंतर सदरील अर्ज हा कार्यालयामार्फत
ऑनलाईनमध्ये भरणा केला जातो. त्या अर्जाची कार्यवाहीबाबतची माहिती नागरिकांना महाभुलेख
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi संकेस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
उपअधिक्षक
भूमी अभिलेख कार्यालयात मिळकत पत्रिकांची नक्कल काढणे व फेरफारसाठी केलेल्या अर्जाची
स्थिती पाहण्याकरिता महाभुलेख संकेतस्थळाचा वापर करावा , असे आवाहन लातूर भुमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक एस. पी. सेठिया यांनी
केले आहे.
Comments
Post a Comment