शहरात क्षयरूग्ण शोध मोहीम १५ ते २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत राबविण्यात येणार
शहरात क्षयरूग्ण शोध
मोहीम
१५ ते २५ नोव्हेंबर
२०२१ पर्यंत राबविण्यात येणार
लातूर,दि.15
(जिमाका) राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण
कार्यक्रम अंतर्गत शहरातील झोपडपट्टी तसेच इतर जोखमीच्या भागात घरोघरी भेट
देवून संशयीत क्षयरूग्ण शोधून
काढण्यासाठी सार्वजनीक आरोग्य विभागामार्फत
दि. १५ ते २५ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत शहरात क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात
येत असल्याचे लातूर शहर महानगरपालिका, लातूर यांनी कळविले आहे.
या मोहिमेअंतर्गत
आरोग्य कर्मचारी व आशा स्वंयसेवीका झोपडपट्टी भाग व इतर जोखमीच्या
कार्यक्षेत्रातील निश्चीत करण्यात आलेल्या
भागात घरोघरी जावून सर्वेक्षण करणार आहेत. सदरील सर्वेक्षण दि. १५ नोव्हे ते २५
नोव्हे या कालावधीत सकाळी ८ ते ११ या वेळेत राबविण्यात येणार आहे. या मोहीमे
अंतर्गत दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, ताप असलेल्या, मागील तीन
महीन्यामध्ये वजनात लक्षणीय घट झालेल्या तसेच थुंकीवाटे रक्त पडणे इ. लक्षणे
आढळूण येणा-या संशयीत रूग्णांचे दोन थुकीनमूने तपासणी व क्ष कीरण तपासणी करण्यात
येणार आहे व क्षयरोग आढळून येणा-या रूग्णांना मोफत औषधेपचार चालू करण्यात येणार
आहे.
या
सर्वेक्षणासाठी घरी येणा-या कर्मचा-यांना सहकार्य करावे व आवश्यकतेप्रमाणे संशयीत
रूग्णांनी आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने
करण्यात येत आहे.
***
Comments
Post a Comment