विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी मोफत टॅबचे वाटप
विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी
मोफत
टॅबचे वाटप
लातूर,दि.24 ( जिमाका ):- महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाज्योती) नागपूर या कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या एमएचटी-सीईटी,
जेईई, नीट (MHT-CET/JEE/NEET) या
प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात
आल्याचे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी प्रसिध्दी
पत्रकाद्वारे कळविले आहे.
या कार्यक्रमात महात्मा ज्योतीबा फुले
संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) संचालक लक्ष्मण वडले यांचे हस्ते
विद्यार्थ्याना मोफत टॅब वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास
प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार, समाज कल्याण विभाग लातूर तसेच समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, शिवाजी माने, बालाजी रेड्डी, शोभा बेंजरगे तसेच एमएचटी-सीईटी, जेईई,
नीट (MHT-CET/JEE/NEET) परिक्षेची तयारी करणारे
39 पात्र लाभार्थी विद्यार्थी
उपस्थित होते.
000
Comments
Post a Comment