आझादी का अमृत महोत्सव निमीत्त

 सिकंदरपूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर यशस्वीरित्या संपन्न

                लातूर,दि.9,(जिमाका):-सिकंदरपूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून गावच्या सरपंच सौ. रेशमा माधवराव गंभीरे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून पॅनल अॅड. आर. के. चव्हाण आणि अॅड. एस.एस.वाघमारे हे उपस्थित होते.

            कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन केशव गंभीरे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी संजय घाडगे यांनी केले. या कार्यक्रमास समस्त गावकरी उपस्थित होते.

            सदर शिबीरामध्ये पॅनल अॅड. आर.के.चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार व महिलांचे अधिकार इ. विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. तसेच अॅड. एस. एस.वाघमारे यांनी बालकांचे शिक्षण विषयक हक्क व अधिकार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत मोफत वकील मिळणेविषयी आणि इतर कायदेविषयक माहिती  सर्व गावकऱ्यांना दिली.

            या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. रेशमा माधवराव गंभीरे यांनी समारोपीय भाषणामध्ये उपस्थित गावकऱ्यांना  जीवन जगत असताना कायदेविषयक बाबी  माहिती असणे  गरजेच्या आहेत असे आवर्जुन सांगितले.

            तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील पॅनल अॅडव्होकेट आणि गावातील सरपंच यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.

                                                     



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु