निर्यातक्षम द्राक्ष बागाची ऑनलाईन नोंदणी येत्या 15 नोव्हेबर पुर्वी करुन घ्यावी -जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे आवाहन

 


निर्यातक्षम द्राक्ष  बागाची ऑनलाईन नोंदणी

येत्या 15 नोव्हेबर  पुर्वी करुन घ्यावी

-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे आवाहन

 

            लातूर,दि.8(जिमाका):- सन 2021-22 मध्ये  युरोपियन युनियन आणि इतर तर देशांना द्राक्ष निर्यात करण्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात  आलेली असल्याने किटकनाशक उर्वरीत अंश आणि किड रोगाची हमी देण्यासाठी ग्रेपनेट व्दारे द्राक्ष बागाची नोंदणी करण्यात येत आहे

          सन 2021-22 वर्षामध्ये युरो‍पियन आणि इतर देशाना द्राक्ष निर्यात करण्यासाठी  नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे.अपेडाच्या मार्गदर्शनाखाली द्राक्ष पिकाची नोंदणी करणेसाठी  ग्रेपनेट प्रणालीव्दारे  सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.सर्व द्राक्ष बागायतदार शेकऱ्यानी सन 2021-22 करीता नोंदणी करण्यासाठी कृषि विभागाच्या कृषि सहाय्यक/कृषि पर्यवेक्षक /कृषि अधिकारी /तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून त्वरीत अर्ज करावेत. ग्रेपनेट व्दारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेबर 2021 असून  विहीत मुदतीमध्ये  अर्ज करुन नोदणी करुन घेण्यात यावी.

          लातुर जिल्हयातुन उत्पादित होणाऱ्या द्राक्षांना विदेशातून विशेष मागणी आहे.तरी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्यातीच्या दृष्टीने बागाची नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे आवाहन केले आहे.

                                                         ***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा