देवणी पोलीस ठाणे येथील मोटार सायकल वाहनाचा लिलाव होणार

 

देवणी पोलीस ठाणे येथील

मोटार सायकल वाहनाचा लिलाव होणार

 

लातूर, दि.23 (जिमाका):-पोलीस ठाणे, देवणी जि.लातूर येथे एकुण 42 मोटार सायकल बेवारस स्थितीत असून अद्यापर्यंत या बेवारस वाहनाचे कागदपत्रे घेवून कोणीही व्यक्ती मालकी हक्क दाखविण्यासाठी आलेले नाही.पोलीस अधिक्षक लातूर यांनी या बेवास वाहनाचा लिलाव करुन सदर बेवारस वाहने निकाली काढण्याचे आदेश दिलेले आहेत.

या अनुषंगाने पोलीस ठाणे देवणी येथील एकुण 42 बेवारस वाहनाचा लिलाव करावयाचा असून त्यावर कोणाचे काही एक अक्षेप किंवा म्हणणे असल्यास त्यांनी सर्व कागदपत्रासह पोलीस ठाणे देवणी येथे पंधरा दिवसाच्या आत संपर्क पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे पोलीस ठाणे देवणी मो.क्र. 9823815125, पोलीस ठाणे क्र. 02385-269133 या क्रमांकावर साधून आपले म्हणणे सादर करावे. सदर बेवारस वाहनांचे नंबर, चेसी नंबर व इंजिन नंबर बाबतची माहिती पोलीस ठाणे देवणी कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे असे पोलीस निरीक्षक पोलीस, ठाणे देवणी, यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                         ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा