17 व 18 नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
17 व 18 नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय
राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
§ अन्न व्यवस्थापन, पीक सरंक्षणातून शाश्वत पीक उत्पादन साध्य करणे या विषयावर
§ भारतीय स्वातंत्र्याचे
अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्यानिमित्त
§ परिसंवादात सहभागी होण्यासाठी 350 संशोधनपर निष्कर्ष प्राप्त
लातूर,दि.10,(जिमाका):- येथील कृषि महाविद्यालय, वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष, नवी दिल्ली येथील भारतीय रोगशास्त्र
संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष आणि भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य
साधून दिनांक 17 व 18 नोव्हेंबर, 2021 दरम्यान दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे अन्न
व्यवस्थापन आणि पीक सरंक्षणातून शाश्वत पीक उत्पादन साध्य करणे या विषयावर वसंतराव
नाईक कृषी विद्यापीठातंर्गत वनस्पती रोगशास्त्र विभाग लातूर व परभणी आणि भारतीय रोगशास्त्र
संस्था, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे आयोजन करण्यात आले आहे.
परिसंवादासाठी
प्रमुख पाहूणे म्हणून माजी कृषी आयुक्त भारत सरकार चारुदत्त मायी तसेच कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक
ढवण उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, कृषी भूषण बी.बी. ठोंबरे, चेअरमन नॅचरल शुगर,
रांजणी विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले, संचालक संशोधन
डॉ. दत्तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण
डॉ. देवराव देवसरकर, तसेच नवी दिल्ली येथील भारतीय रोगशास्त्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतिभा शर्मा व सचिव डॉ. रोबीन गोगोई हेदेखील
उपस्थित राहणार आहेत.
परिसंवादात
सहभागी होण्यासाठी 350 संशोधनपर निष्कर्ष प्राप्त झाले असून देशातील विविध राज्यातील
वैज्ञानिक, संशोधक, अभ्यासक , प्राध्यापक, कृषी
उद्योजक, विद्यार्थी व शेतकरी सहभागी होवून पीक संरक्षणावर मंथन करणार आहेत.
या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन अंगद सुर्यवंशी सहयोगी अधिष्ठाता, व प्राचार्य कृषी
महाविद्यालय, लातूर आणि स्थानिक आयोजन समितीचे सचिव डॉ. आनंद कारले यांच्या मार्गदर्शनाखाली
कृषी महाविद्यालयातील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कै. विलासराव देशमुख कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय,
कृषी तंत्र विद्यालय, गळीत धान्य संशोधन केंद्र, लातूर येथील प्रा. अधिकारी आणि कर्मचारी
यांच्या सहकार्याने परिसंवादाचे लातूर येथे आयोजन करण्यात आले आहे.
000
Comments
Post a Comment