जळकोट, देवणी, चाकूर व शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर चारही नागरी क्षेत्रात आचारसंहिता लागू

 

जळकोट, देवणी, चाकूर व शिरुर अनंतपाळ

नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

चारही नागरी क्षेत्रात आचारसंहिता लागू

लातूर,दि.26 (जिमाका) :- राज्य निवडणूक आयोग यांनी दि. 24 नोव्हेंबर, 2021 च्या पत्रान्वये लातूर जिल्ह्यातील जळकोट, देवणी, चाकूर व शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या आदेशाच्या तारखेपासून चारही नगर पंचायतीमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहणार आहे. निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील:-

 अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्दीचा सोमवार, दिनांक 29 नोव्हेंबर, 2021 . जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम मंगळवार, दिनांक 30 नोव्हेंबर, 2021 . नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी बुधवार, दिनांक 1 डिसेंबर, 2021 सकाळी 11-00 ते मंगळवार, दिनांक 7 डिसेंबर, 2021 दुपारी 2-00 पर्यंत .

वरील नामनिर्देशपत्रे स्विकारण्याचा कालावधी बुधवार, दिनांक 1 डिसेंबर, 2021 ते मंगळवार, दिनांक 7 डिसेंबर, 2021  सकाळी 11-00 ते दुपारी 3-00 पर्यंत. शनिवार दिनांक 4 डिसेंबर, 2021 रविवार, दिनांक 5 डिसेंबर, 2021 रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशपत्र स्विकारण्यात येणार नाहीत.  नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक बुधवार, दिनांक 8 डिसेंबर, 2021 सकाळी 11-00  वाजल्यापासून . अपील असल्यास वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवरांची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवासंच्या आत, जिल्हा न्यायाधिशाकडे अपिल करता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी करावेत. अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी, मात्र गुरुवार, दिनांक 16 डिसेंबर, 2021 पर्यंत. निवडणूक चिनह नेमून देण्याचा तसेच अंमितरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक मंगळवार, दिनांक 21 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 7-30 पासून ते सांयकाळी 5-30 पर्यंत . मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा बुधवार, दिनांक 22 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 10-00 वाजल्यापासून . महाराष्ट्र  शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे कलम 19 मधील तरतुदीनुसार .

*या निवडणुकीसाठी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे यांनी पुढीलप्रमाणे* *अधिकारी नियुक्त केले आहेत.*

नगरपंचायत शिरुर अनंतपाळसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून औसा- रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, भ्रमणध्वनी क्रमांक 9422370239 ई-मेल –sdmausarenapur@gmail.com  , शिरुर अनंतपाळ तहसीलदार अतूल जटाळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून क्र. १ भ्रमणध्वनी क्रमांक 9423727212 ई-मेल tahsildarshiruranantpal@ gmail.com , नगर पंचायत शिरुर अनंतपाळ मुख्याधिकारी मंगेश शिंदे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून क्र. 2 भ्रमणध्वनी क्रमांक 7387117777, 9322231136 ई-मेल npshiranantpal@gmail.com.

नगर पंचायत चाकूरसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अहमदपूर उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, भ्रमणध्वनी क्रमांक 8378992101 ई-मेल – sdmahmadpur@gmail.com  तहसीलदार चाकूर शिवानंद बिडवे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून क्र. १ भ्रमणध्वनी क्रमांक 9403140400 ई-मेल chakurtahsildar@gmail.com , चाकूर नगर पंचायतचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून क्र. 2 भ्रमणध्वनी क्रमांक 9403924957/ 8668243289 ई-मेल  npchakur@gmail.com  .

नगरपंचायत देवणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निलंगा उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभादेवी जाधव, भ्रमणध्वनी क्रमांक 9423341317 ई-मेल – sdmnilnga@gmail.com  तहसीलदार देवणी  सुरेश घोळवे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून क्र. १ भ्रमणध्वनी क्रमांक 9881294665 ई-मेल tahsildardeoni@gmail.com , नगर पंचायत देवणी मुख्याधिकारी सुंदर बोंदर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून क्र. 2 भ्रमणध्वनी क्रमांक 8888027071 ई-मेल npdeoni@gmail.com .

नगरपंचायत जळकोटसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उदगीर उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, भ्रमणध्वनी क्रमांक 9422769432 ई-मेल – sdmudgir@gmail.com  तहसीलदार जळकोट श्रीमती सुरेखा स्वामी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून क्र. १ भ्रमणध्वनी क्रमांक 9763640855 ई-मेल jalkottahsildar@gmail.com , नगर पंचायत जळकोट मुख्याधिकारी भारत राठोड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून क्र. 2 भ्रमणध्वनी क्रमांक 9423350777/7020747600 ई-मेल jalkotnarpanchayat@gmail.com .  

उमेदवारी आपले अर्ज ऑनलाईन दाखल करावयाचे असून राखीव जागावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आपल्या अर्जासोबतच जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत, असे नगर पालिका प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त सतिश शिवणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा