आझादी का अमृत महोत्सव“ निमीत्त बंद्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर जिल्हा कारागृह, लातूर येथे संपन्न

 

आझादी का अमृत महोत्सव

निमीत्त बंद्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन

 शिबीर जिल्हा कारागृह, लातूर येथे संपन्न

 

लातूर,दि.1(जिमाका):- जिल्हा कारागह लातूर येथे बंद्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर व समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर न्या. सुरेखा कोसमकर, या होत्या. या कार्यक्रमामध्ये  न्या.जे. एम. दळवी, जिल्हा न्यायाधीश -4, लातूर, न्या. एन.आर. तळेकर, मुख्य दिवाणी न्यायाधीश व. स्तर, लातूर, मा. न्या. जी. आर. ढेपे, मुख्य न्यायदंडाधिकारी, लातूर, न्या. श्रीमती एस. डी. अवसेकर, न्यायाधीश, तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर, न्या. मंगेष लुनिया अति. सह दिवाणी न्यायाधीष क. स्तर, लातूर, न्या. निखील चव्हाण अति. सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, लातूर, न्या. कुणाल कुमार वाघमारे, अति. सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, लातूर, व एम. व्ही. चौधरी तुरुंगाधिकारी, लातूर जिल्हा कारागृह,लातूर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास साधन व्यक्ती म्हणुन अॅड. रमेष कुचमे, जिल्हा न्यायालय, लातूर, अॅड. छाया मलवाडे व अॅड. अजय कलशेट्टी हे उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. छाया मलवाडे यांनी केले व प्रास्ताविक न्या. श्रीमती एस. डी. अवसेकर, न्यायाधीश, तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर, यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एम. व्ही. चौधरी तुरुंगाधिकारी, लातूर जिल्हा कारागृह,लातूर यांनी केले. सदरील कार्यक्रमास जेल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            या शिबीरामध्ये न्या. जी. आर. ढेपे, मुख्य न्यायदंडाधिकारी, लातूर, यांनी बंदी कैद्यांना जेल प्रशासनाकडुन मिळणाऱ्या सुविधा, आरोग्य विषयक तरतुदी, त्यांचे हक्क व कर्तव्य याबाबतची सविस्तर माहिती बंदी कैद्याना दिली. तसेच याबाबतचे जेल मॅन्युअल प्रमाणे पाळावयाची शिस्त याबाबतची माहिती बंदी कैद्यांना देण्यात आली.  न्या. एन.आर. तळेकर, मुख्य दिवाणी न्यायाधीश व. स्तर, लातूर यांनी कैद्यांचे हक्क व अधिकार याबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी न्या. मंगेष लुनिया अति. सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, लातूर, यांनी जामीन च्या कायदेशिर तरतुदी बाबत देखील बंदी कैद्यांना कायदेविषयक माहिती दिली.

            आपल्या अध्यक्षीय समारोपात न्या. सुरेखा कोसमकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांनी बंदी कैद्यांच्या शैक्षणिक सुविधां विषयी माहिती देवून बंदी कैद्यांना देखील शिक्षणाचा मार्ग उपलब्ध करुन  देण्याबाबत सांगितले. तसेच बंदी कैद्यांना कारागृहामध्ये काम केल्यानंतर त्यापासून काय मोबदला मिळतो याची देखील माहिती त्यांनी बंदी कैद्यांना करुन दिली.

      बंदी कैद्याने त्यांची शिक्षा पूर्ण होताच कारागृहातुन मुक्तता झाल्यानंतर त्यांनी त्यांचे पुढील आयुष्य एका जबाबदार नागरिकाप्रमाणे व्यतित करण्याचे आवाहन केले. या समुपदेशनाचा नक्कीच बंदी कैद्यांच्या मुक्ततेनंतर त्यांच्या भावी आयुष्यावर दिर्घकालीन सकारात्मक परिणाम दिसून येवू शकतात.

            तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील न्यायिक कर्मचारी व जेल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.  कार्यक्रमाचे वृत्त संकलन अॅड. आर. सी. पाटील यांनी केले.

                                                                                            ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु