जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त विशेष शिबीरास अहमदपूर येथून सुरुवात
जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त
विशेष शिबीरास अहमदपूर येथून सुरुवात
लातूर,
दि.23 (जिमाका):- जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर व जिल्हा शिक्षण
व प्रशिक्षण संस्था, मुरुड यांच्या वतीने यु डी आय डी (स्वावलंबन कार्ड) रेजीस्ट्रेशन
व निरामय योजना लाभार्थी यांची नोंद घेण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असून
याची सुरुवात अहमदपूर येथून झाली आहे.
जिल्ह्यातील
पूर्व प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विशेष गरजा धारक विद्यार्थी यांना विविध
शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यु डी आय डी (स्वावलंबन कार्ड) असणे बंधनकारक
आहे. तसेच कांही दिव्यांग मुलांना दरमहा औषधोपचारासाठी खर्च करावा लागतो त्याची प्रतिपुर्ती
मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय न्यास कायदा अंतर्गत निरामय आरोग्य विमा योजना यामध्ये
नोंदणी होणे आवश्यक आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत टीम तयार करण्यात
आली असून दिव्यांगांना जागेवरच स्वावलंबन कार्ड नोंदणी व निरामय योजनेची नोंदणी करण्यात
येत आहे. शिबीरामध्ये दिव्यांगांना घेवून येणे तसेच शिबीराची व्यवस्था सर्व शिक्षा
अभियान, लातूर ची टीम करीत आहे.
अहमदपूर येथील शिबीरास गट शिक्षणाधिकारी बी. एम. ढोकडे, समावेशीत शिक्षण
विशेष तज्ज्ञ मोघे सी एस. व बिलापट्टे एन .इ. विशेष शिक्षक श्रीमती सुरवसे
.ए. बी., डिकळे डी. आर. श्रीमती यंगडे एस पी., हासमी एम .एस., जाधव एस एस.व परिचर शेळके आर. जी . जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत
योगेश्वर बुरांडे, वाचा उपचार तज्ञ, शिवाजी चौरे, विशेष शिक्षक, आदर्श भस्मे कार्यालयीन
सहाय्यक यांची उपस्थिती होती.
दि.
22 नोव्हेंबर 2021 ते दि. 3 डिसेंबर 2021 या दरम्यान तालुकानिहाय शिबीराचे आयोजन करण्यात
आले आहे. यामध्ये 22 नोव्हेंबर - अहमदपूर, 23 नोव्हेंबर - औसा, 24 नोव्हेंबर - चाकूर,
25 नोव्हेंबर -देवणी, 26 नोव्हेंबर - लातूर, 29 नोव्हेंबर - जळकोट, 30 नोव्हेंबर -
निलंगा, 1 डिसेंबर - शिरुर अनंतपाळ, 2 डिसेंबर- रेणापूर व जागतिक दिव्यांग दिनी दि.
3 डिसेंबर रोजी उदगीर येथे समारोप होणार आहे.
शिबीराचा लाभ घेण्याकरिता संबंधीत तालुक्याच्या
गटसाधन केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूरच्या
वतीने करण्यात आले आहे.
****
Comments
Post a Comment