धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या पहिली व दुसरी वर्गात शिक्षण देण्याकरिता 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या

पहिली व दुसरी वर्गात शिक्षण देण्याकरिता 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 

        लातूर,दि.26 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता लातूर जिल्ह्यातील जयहिंद पब्लिक स्कुल उदगीर, महात्मा फुले पब्लिक स्कुल कुणकी रोड जळकोट, स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कुल एमआयडीसी कळंब रोड, लातूर , बिर्ला ओपन माईडंस इंटरनॅशनल स्कूल उदगीर, शारदा इंटरनॅशनल स्कुल अंबेजोगाई रोड लातूर या पाच शाळेची निवड झालेली आहे. या शाळेमध्ये प्रवेशाकरिता दिनांक 5 डिसेंबर, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. प्रवेश घेण्यास इच्छूक विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

       या शाळेमध्ये या योजनेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना शासन निर्णय दिनांक 4 सप्टेंबर, 2021 अन्वये देण्यात आलेल्या सोयी-सुविधा मोफत उपलब्ध असून सदर शाळेत प्रवेशाकरिता दिनांक 5 डिसेंबर, 2021 पर्यंत सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण, लातूर या कार्यालयाकडे लेखी स्वरुपात अर्ज करण्यात यावेत. अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, लातूर या कार्यालयात तसेच लातूर जिल्ह्यातील तालुका स्तरावरील शासकीय वसतीगृहात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी श्रीमती प्रणिता सुर्यवंशी यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक 7972535516 यावर संपर्क साधावा.

         या योजनेतंर्गत या शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे. या योजनेकरिता विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये इयत्ता पहिली किंवा दुसरीमध्ये शिक्षण घेणारा असावा. विहीत नमुन्यातील अर्ज ( या कार्यालयात तसेच तालुकास्तरीय शासकीय वसतीगृहात उपलब्ध आहेत), जातीचा दाखला, जन्माचा दाखला, पालकाचे उत्पन्न ( एक लाखाच्या आत असावे) या अटींची पुर्तता करत असलेल्या धनगर समाजातील जास्तीत -  जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांच्याकडून करण्यात येत आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु