राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्यविक्री विरोधात धडक कारवाई

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाची

अवैध मद्यविक्री विरोधात धडक कारवाई

 

        लातूर,दि.25-(जिमाका)- राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांना मिळालेल्या माहिती नुसार हरंगुळ (बु) ता.जि. लातूर येथे बंद असलेल्या गोडाऊन मध्ये छापा टाकून वाईन, बिअर व विदेशी मद्यांचा साठा याची किंमत 9 लाख 93 हजार 389 रुपयाचा माल जप्त करुन धडक कारवाई केली असल्याचे  राज्य उत्पादन शुल्क चे अधिक्षक गणेश बारगजे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

      राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिलेल्या आदेशानुसार विभागीय उप-आयुक्त पी.एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हयातील अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार स्वत:अधिक्षक गणेश बारगजे व त्यांच्या समवेत निरीक्षक, स्टाफ यांनी अतिरिक्त एम.आय.डी.सी. प्लॉट नं.5 अल्कोल्पस कारखान्यासमोर हरंगुळ (बु.) ता.जि. लातूर येथे बंद अवस्थेत असलेल्या कंपनी गोडावून मध्ये दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री उशीरा टाकलेल्या छाप्यामध्ये वाईन- 903 लिटर, बिअर-35 लिटर, विदेशी मद्य 110 लिटर असा एकून 9 लाख 93 हजार 389 रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

        या कारवाईत गोडावून चा चौकीदार मुस्तफा दादामियाँ कामलपुरे, वय- 60 वर्षे, रा. आलमला, ता.औसा जि.लातूर यास अटक करुन मुंबई दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील तपास निरीक्षक, राहुल बांगर करत आहेत.

           अवैध मद्यविक्री विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क चे अधिक्षक गणेश बारगजे यांनी सांगीतले असून  जिल्हयात अवैध व परराज्यातील मद्यविक्री, वाहतूक होत असल्यास त्याबाबतची माहिती या कार्यालयास कळविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

                                                      ****

         

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु