आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत कायदेविषयक व विविध शासकीय योजनांची माहिती व अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शिबीराचे आयोजन

 

आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत

 

कायदेविषयक व विविध शासकीय योजनांची माहिती व

अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शिबीराचे आयोजन

लातूर,दि.12 (जिमाका):- मा. सर्वोच्च न्यायालय व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आझादी का अमृत महोत्सवानिमित्त नविन जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे दि. 14 नोव्हेंबर 2021 रोजी कायदे विषयक व विविध शासकिय योजनांची माहिती व अंमलबजावणी करण्यासाठी महाषिबीर संपन्न होणार आहे.

सर्व सामान्य नागरिकांना शासकिय विभाग विविध योजनांच्या माध्यमातून सेवा पुरवित असतात. या विविध शासकीय योजनांची माहिती व जनजागृती नागरिकांना व्हावी, म्हणून दि. 14 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा विधीज्ञ मंडळ,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे कायदेविशयक व विविध षासकिय योजनांबाबत महाषिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व विभागांनी आपआपल्या विविध योजनांची माहिती या शिबिराच्या अनुषंगाने नागरिकांना द्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती एस.डी.अवसेकर यांनी केले आहे.

दि. 14 नोव्हेंबर, 2021 या दिवषी आझादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे सकाळी 10.30 वाजल्यापासून या शिबीरास सुरुवात होणार आहे. या शिबीरात विविध शासकीय विभागांमार्फत शासकीय योजनांचे स्टॉल लावून नागरिकांना थेट सेवांची माहिती पुरविण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मोठया संख्येने उपस्थित राहुन या महाषिबीराचा लाभ घ्यावा.

00000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु