रब्बी 2021 हंगामासाठी सातबारा व आधारकार्ड व्दारे अनुदानित दराने ज्वारी, हरभरा व गहु बियाणे उपलब्ध

 

रब्बी 2021 हंगामासाठी सातबारा व आधारकार्ड व्दारे

अनुदानित दराने ज्वारी, हरभरा व गहु बियाणे उपलब्ध

 

 

            लातूर,दि.1(जिमाका):- रब्बी 2021 हंगामामध्ये रार्ष्टीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत प्रमाणीत बियाणे  वितरणामध्ये सातबारा व आधारकार्ड व्दारे अनुदानीत दराने सु.ज्वारी, फुले रेवती, फुले वसुधा, परभणी मोती व एम-35-1 (मालदांडी) हरभरा – राजविजय-202 फुले विक्रम, फुले विक्रांत व पिडी. के.व्ही. कांचन बियाणे महाबीज विक्रेते व उपविक्रेत्याकडे उपलब्ध्‍ झाले आहे. त्यासाठी लॉटरी मध्ये ज्यांची नावे आहेत. तसेच ज्वारी व हरभरा पिकासाठी त्यांची नावे लॉटरीसाठी नोंदणी केली नसतील तर अशा शेतकऱ्यांनी त्यांची सातबारा, आधार कार्डची झेरॉक्स प्रत देऊन महाबीज विक्रेते व उपक्रिते यांच्याकडे अनुदानीत दराणे बियाणे खरेदी करावे. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त क्षेत्रानुसार 5 एकर पर्यंतचे बियाणे अनुदानीत दराने घेता येईल.

      तसेच ग्राम बिजोत्पादन योजनेअंतर्गत अनुदानीत दराने हरभरा जॅकी-9218 व गहु बियाणे एका एकर क्षेत्रासाठी अनुदानीत दराने बियाणे मिळेल. अनुसुचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी महाबीज विक्रेते व उपविक्रेते यांचेकडे सातबारा, आधारकार्ड झेरॉक्स प्रत देऊन महाबीज विक्रेता व उपविक्रेत्याकडून अनुदानीत दराने बियाणे खरेदी करावे.  सदरील बियाणे उपलब्ध्‍ असे पर्यंत अनुदानीत दराने मिळेल व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील याची नोंद घ्यावी.

          अनुदानीत दराने सु.ज्वारी, 4 किलो बॅगची, फुले रेवती किंमत रु. 120 प्रति बॅग फुले वसुधा, मालदांडी प्रति बॅग 124 परभणी मोती व परभणी ज्योती रु. 152 प्रति बॅग व हरभरा 20 किलो पॅकींगची राजविजय-202, फुले विक्रम, फुले क्रिांत, एकेजी-1109 यावाणाची किंमत रु. 1220 प्रति बॅग या दराणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत प्रमाणीत बियाणे वितरणा करीता उपलब्ध्‍ आहे.

तसेच ग्रामविजोत्पादन योजनेअंतर्गत हरभरा जॅकी-9218 अंतर्गत 30 किलोची बॅग रु. 1650 प्रति बॅग प्रमाणे व गहु 10 वर्षा आतिल वाणाचे बियाणे 40 किलो रु. 920 प्रति बॅग 10 वर्षा वरील वाणाची 40 किलोची बॅग रु. 840 प्रति बॅग प्रमाणे उपलब्ध्‍ आहे.तरी शेतकऱ्यांनी महाबीजल विक्रेते व उपविक्रते यांचेकडे सातबारा, आधारकार्ड देऊन अनुदानीत दराने बियाणे खरेदी करावे व योजनेचा लाभ घेण्यात यावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर जिल्हा व्यवस्थापक महाबीज लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                                            ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा