समाजभूषण पुस्तक म्हणजे अस्तित्वभानाची कहाणी --राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे प्रशंसोदगार

 


समाजभूषण पुस्तक म्हणजे अस्तित्वभानाची कहाणी

                                                                 --राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे प्रशंसोदगार

         लातूर,दि.3 (जिमाका):-

राज्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ लिखित समाजभूषण हे पुस्तक म्हणजे कासार समाजातील नव्याने आलेल्या अस्तित्वभानाची प्रेरक कहाणी होय, असे प्रशंसोदगार महाराष्ट्राचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, भूकंप पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी नुकतेच येथे काढले.

           पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या, राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त उप प्राचार्या , सौ. स्मिता दगडे यांची यशकथा  समाजातील उगवत्या प्रतिभावंताना नवी दिशा देणारी आहे, अशा शब्दांत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी प्रा.सौ. दगडे यांचे कौतुक केले.

         ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांच्या निवासस्थानी राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीचे औचित्य साधून यावेळी समाजभूषण पुस्तकाचे श्री. बनसोडे हस्ते स्थानिक पातळीवर विमोचनही करण्यात आले. वेगवेगळया क्षेत्रात संघर्ष करून यशाचे शिखर सर केलेल्या कासार समाजातील गुणवत्ता संपन्न व्यक्तींच्या जीवनकार्याचा हा संक्षिप्त लेखाजोखा,  बदलत्या व मळलेल्या वाटा सोडून नव्या   वाटेने प्रवास करणाऱ्या कासार  समाजाची इतर समाजाला नवी ओळख सांगणारा आहे, असेही राज्यमंत्री  बनसोडे म्हणाले.

             या प्रसंगी लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सचिव अभय साळुंके, उदगीरचे गुरूडे, पीटीआय प्रतिनिधी प्रा. विनोद चव्हाण, दगडे डेव्हलपर्सचे प्रतीक दगडे, प्रणित सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. प्रारंभी जयप्रकाश दगडे यांनी  समाजभूषण पुस्तकाची उपयुक्तता आणि वैशिष्ट्ये स्पष्ट केली.

                                                         

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा