धनगर समाजातील विद्यार्थ्यानी शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता अर्ज करावेत -- समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांचे आवाहन

 

धनगर समाजातील विद्यार्थ्यानी शहरातील इंग्रजी माध्यमाच्या

नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता अर्ज करावेत

-- समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांचे आवाहन

लातूर,दि.11 (जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहूजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये  शिक्षण  देण्याची योजना सुरू करण्यात आलेले आहे.

या योजनेमध्ये लातूर  जिल्ह्यातील जयहिंद पब्लिक स्कुल  उदगीर , महात्मा फुले पब्लिक स्कुल, कुणकी रोड जळकोट, स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लीश स्कुल एम.आय.डी.सी. कळंब रोड लातूर,  बिर्ला ओपन माईडंस इंटरनॅशनल स्कुल उदगीर ,  शारदा इंटरनॅशनल स्कुल अंबेजोगाई रोड लातूर या पाच  शाळेची  निवड झालेली आहे.

या शाळेमध्ये या योजनेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना शासन  निर्णय दिनांक 04 सप्टेंबर, 2021  अन्वये देण्यात आलेल्या सोई-सुविधा मोफत उपलब्ध असून सदर शाळेत या योजनेतंर्गत अर्ज करण्याकरिता दिनांक 25नोव्हेंबर, 2021  ही  अंतिम दिनांक असून प्रवेश घेणेकरिता  सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर या कार्यालयाकडे  लेखी  स्वरूपात अर्ज  करण्यात यावेत. अर्ज  लातूर समाज कल्याणचे सहायक आयुक्त यांच्या कार्यालयात तसेच  लातूर जिल्हयातील तालुका स्तरावरील  शासकीय वसतीगृहात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी  श्रीमती प्रणिता सुर्यवंशी  यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7972535516  यांच्याशी संपर्क करावा. या योजनेतंर्गत उपरोक्त शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता पुढीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक राहतील.  

या योजनेकरिता विद्यार्थी शैक्षणिक वर्ष  2021-22 मध्ये इयत्ता पहिली किंवा दुसरीमध्ये  शिक्षण  घेणारा असावा, विहित नमुन्यातील अर्ज (या कार्यालयात तसेच  तालुकास्तरीय शासकीय वसतीगृहात उपलब्ध  आहेत), जातीचा दाखला ,  जन्माचा दाखला,  पालकाचे उत्पन्न  ( एक लाखाचे आत असावे) या अटींची पुर्तत: करत असलेल्या धनगर समाजातील  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                              ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु