विशेष मतदार नोंदणी शिबीरचे 27 व 28 नोव्हेंबर रोजी आयोजन
विशेष मतदार नोंदणी
शिबीरचे 27 व 28 नोव्हेंबर रोजी आयोजन
लातूर,दि.24 ( जिमाका ):- मुख्य निवडणूक अधिकारी यांचे
निर्देशानुसार दिनांक 27 व 28 नोव्हेंबर, 2021 या दिवशी प्रत्येक मतदान
केंद्रांवर मतदार नोंदणीसंदर्भात विशेष मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे
उपजिल्हा निवडणूकअधिकारी सदाशिव पडदुणे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार दिनांक 01 जानेवारी 2022 या
अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित
केला आहे. सदर पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत दावे व
हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच, दिनांक- 01 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप
मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून अंतिम मतदार यादी दिनांक 05 जानेवारी 2022
रोजी प्रसिद्ध होणार आहे. दिनांक 01 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण करणारे
नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विशेष
पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अथवा आपण अद्याप
मतदार म्हणून नोंदणी केली नसेल अशा नागरिकांना छायाचित्र मतदार यादीच्या विशेष
पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आपले नाव मतदार म्हणून नोंदवता येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्हयातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान
केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना नागरीकांकडून नांव नोंदणीबाबतचे अर्ज
स्विकारण्यासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यांत आले आहेत. राजकीय पक्षांचे
मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (BLA) यांनी सदर मोहिमेस उपस्थित राहावे, असे अवाहन केले
आहे. सदर कार्यक्रमास सहायक मतदार यादी निरीक्षक तथा उपायुक्त (पुरवठा),
विभागीय आयुक्त कार्यालय,औरंगाबाद हे भेट देणार आहेत. तसेच, दिनांक 25
नोव्हेंबर 2021 रोजी लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत
क्षेत्रात प्रभाग निहाय मतदार यादी
वाचन कार्यक्रम आयोजित कारण्यात येणार असून त्यामध्ये मतदार यादीचे वाचन
करण्यात येणार आहे.
छायाचित्र मतदार ओळखपत्र हे मतदारांची
ओळख पटविण्यासाठी असून मतदारांचे नाव मतदार यादीत असेल तरच मतदान करता येते. त्यासाठी
त्यांचेकडे ओळखपत्र असले तरीही मतदार यादीत नाव असल्याची खातरजमा करून
घेणे आवश्यक आहे. जेणेकरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत
मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क गमावण्याची वेळ येणार नाही. तसेच, नागरिकांना
एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार नाही.
नागरीकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी
https://ceo.maharashtra.gov.in किंवा www.electoralsearch.in या
संकेतस्थळाला भेट द्यावी. सदर कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी
किंवा आपल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपणास Voter Helpline App या मोबईल अॅप द्वारे किंवा https://www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करता येईल.
त्यानुसार लातूर जिल्ह्यातील दिनांक 01
जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण करणारे नागरिक व अद्याप मतदार म्हणून नोंदणी
केली नसेल अशा सर्व पात्र नागरीकांनी छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण
कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसंदर्भात विशेष मोहिमेत विहित नमुन्यातील अर्ज भरून (आवश्यक
कागदपत्रासह) आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे अवाहन जिल्हाधिकारी तथा
जिल्हा निवडणूक अधिकारी, पृथ्वीराज बी.पी., यांनी केले आहे.
अर्जाची
माहिती
प्रथम
नाव नोंदणी करणाऱ्या मतदारांसाठी अथवा मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी- अर्ज
क्र. 6 अनिवासी मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी- अर्ज
क्र. 6 अ, इतर व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्याबाबत आक्षेप घेण्यासाठी / स्वतःचे
नाव वगळण्यासाठी / इतर कोणत्याही
व्यक्तीचे नाव मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी- अर्ज क्र., मतदार
यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्त्यांसाठी- अर्ज क्र. 8 व ज्यावेळी
एकाच मतदारसंघात निवासस्थान एका ठिकाणाहून इतर ठिकाणी स्थानांतरित झाले असल्यास- अर्ज
क्र. 8 अ
****
Comments
Post a Comment