विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून आपले नांव नोंदवावे ; 16 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन -- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आवाहन

 

विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून आपले नांव नोंदवावे ;

 16 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन  

                                -- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आवाहन

 

लातूर,दि.12 (जिमाका):- मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार दिनांक 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. सदर पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दिनांक- 01 नोव्हेंबर 2021 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच, दिनांक- 01 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून अंतिम मतदार यादी दिनांक 05 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. दिनांक 01 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण करणारे नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र होणार आहेत. नुकत्‍याच पार पडलेल्‍या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्‍हणून नोंदणी झालेली नाही अथवा आपण अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसेल अशा नागरिकांना छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आपले नाव मतदार म्हणून नोंदवता येणार आहे.

            मा.मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानुसार दिनांक 13 व 14 नोव्हेंबर,2021 व दिनांक 27 व 28 नोव्हेंबर, 2021 या दिवशी प्रत्‍येक मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीसंदर्भात विशेष मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात येणार आहे. सदर कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्हयातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) (BLO) यांना नागरीकांकडून नांव नोंदणीबाबतचे अर्ज स्विकारण्यासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यांत आले आहेत. सदर कार्यक्रमास मा.सहायक मतदार यादी निरीक्षक तथा उपायुक्त (पुरवठा), विभागीय आयुक्त कार्यालय,औरंगाबाद यांनी दिनांक 12 नोवहेंबर 2021 रोजी भेट दिली व जिल्हयातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत आयोजित बैठकीत राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (BLA) यांनी सदर मोहिमेस उपस्थित राहावे, असे अवाहन केले आहे.  तसेच, दिनांक 16.11.2021 रोजी लातूर जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार असून ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे.

              छायाचित्र मतदार ओळखपत्र हे मतदारांची ओळख पटविण्‍यासाठी असून मतदारांचे नाव मतदार यादीत असेल तरच मतदान करता येते. त्‍यासाठी त्‍यांच्याकडे ओळखपत्र असले तरीही मतदार यादीत नाव असल्‍याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क गमावण्याची वेळ येणार नाही. तसेच, नागरिकांना एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार नाही. नागरीकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्‍यासाठी https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा Voter Helpline App  या मोबईल अॅपचा वापर करावा. तसेच, 01 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) (BLO) यांचेकडे उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे. सदर मतदार यादीमध्येही आपले नावाची तपासणी करता येईल.

             या कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी किंवा आपल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपणास Voter Helpline App  या मोबईल अॅप द्वारे किंवा https://www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करता येईल.    

             त्‍यानुसार लातूर जिल्ह्यातील दिनांक 01 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण करणारे नागरिक व अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसेल अशा सर्व पात्र नागरीकांनी छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसंदर्भात विशेष मोहिमेत विहित नमुन्यातील अर्ज भरून (आवश्यक कागदपत्रासह) आपले नाव मतदार यादीमध्‍ये नोंदवावे, असे आवाहन श्री. पृथ्वीराज बी.पी., जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पृथ्वीराज बी.पी. लातूर यांनी आवाहन केले आहे.

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु