जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पूर्व नियोजन बैठक संपन्न
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पूर्व
नियोजन बैठक संपन्न
लातूर,दि.24 ( जिमाका ):- जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबर निमित्त शासकीय
यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब सारख्या सामाजिक संघटनेचा
सहभाग घेवून तसेच दिव्यांगाच्या विशेष शाळा / कार्यशाळेमध्ये दिव्यांगासाठी विविध
कार्यक्रम राबविणे बाबत आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांचेमार्फत
निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या
अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न झाली.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,
जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर,जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ.एम.बी.शिंदे,अधिष्ठता विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे
डॉ.लक्ष्मण सुरकुंडे,सहाय्यक आयुक्त्,समाजकल्याण विभाग शिवकांत चिकुर्ते,सहाय्यक
आयुक्त, कौशल्य विकास विभाग बालाजी मोरे,अति.आयुक्त,महानगरपालिका शिवाजी गवळी, लिड
बँक शाखा व्यवस्थापक अे के कसबे, विविध विभागातील प्रतिनिधी तसेच ऑनलाईन व्हि. सी.
व्दारे पंचायत समितीमधील सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये महारार्ष्टातील पहिल्या
दिव्यांगासाठी जिल्हा परिषद मार्फत कला ॲकॅडमी व इ- अभ्यिासिकेचे तसेच उमंग
ईन्सटीटयुट ऑफ ऑटीझम ॲन्ड मल्टीडिसॅबीलीटी रिसर्च सेंटर मधील देशातील पहिल्या
सेंन्सरी गार्डनचे उद्घाटन तसेच भव्य मानसिक आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार
आहे.जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत दिव्यांगाच्या विविध तपासणी शिबीराचे
आयोजन करण्यात येणार आहे. महानियंत्रक राज्य परिवहन यांच्या मार्फत UDID
वरुन बस पास तयार करण्यासाठी पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे.
आयुक्त समाज कल्याण
यांच्या मार्फत जेष्ठ दिव्यांगाचा सत्कार समारंभ, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास यांच्या
मार्फत दिव्यांगासाठी डाटा एन्ट्री प्रशिक्षणाचे आयोजन लायन्स क्लब उदगीर यांच्या
मार्फत 26 डोळयांच्या शस्त्रक्रियेसाठी शिबीराचे आयोजन, पंचायतसमिती स्तरावरुन
दिव्यांगासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे बाबत जिल्हाधिकारी तसेच मुख्य
कार्यकारी अधिकारी यांनी बैठकीमध्ये सुचना दिलेल्या आहेत.
Comments
Post a Comment