राष्ट्रनिर्माण व देशभक्ती या विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन
राष्ट्रनिर्माण
व देशभक्ती या विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन
लातूर,दि.25-(जिमाका)- युवा कार्यक्रम
व क्रिडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत नेहरु युवा केंद्र लातूर मार्फत भारतीय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रनिर्माण व देशभक्ती या विषयावर भाषण
स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे जिल्हा युवा अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
सर्वप्रथम प्रत्येक तालुकास्तरावर निवड
चाचणी करण्यात येवून तालुकास्तरावर प्रथम, व्दितीय व तृतिय आलेल्या स्पर्धेकाला जिल्हास्तरावरीय
स्पर्धेत आमंत्रित करण्यात येईल.जिल्हास्तरावर प्रथम येणारा स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी
पात्र असेल त्याचप्रमाणे राज्यस्तरावर प्रथम येणारा स्पर्धक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी
पात्र असेल.
राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या या स्पर्धेसाठी
भाषेचे माध्यम हे हिंन्दी किंवा इंग्रजी मधून असेल. जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला
रु. 5 हजार, व्दितीय येणाऱ्या स्पर्धकाला रु. 2 हजार व तृतिय येणाऱ्या स्पर्धकांला
रु. 1 हजार चे बक्षीस व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात येईल.त्याच प्रमाणे राज्यपातळीवर
प्रथम रु. 25 हजार व्दितीय रु. 10 हजार तृतिय रु. 5 हजार राष्ट्रीय पातळीवर प्रथम रु.
2 लाख, व्दितीय रु. 1 लाख व तृतिय रु. 50 हजार बक्षीस देण्यात येवून सन्मान करण्यात
येईल.
लातूर जिल्हयात तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन
दिनांक 26 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत करण्यात येत असून 18 ते 25 वयोगटातील लातूर
जिल्हयातील जासतीत जास्त युवकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी
साक्षी समैया यांनी केले आहे. तालुकास्तरीय स्पर्धेचे ठिकाण, वेळ व अन्य नियम अटी साठी
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 02382-295598 वर संपर्क करावा.
****
Comments
Post a Comment