लवाद नामतालिका तयार करण्यासाठी अर्ज दाखल करावेत

 

लवाद नामतालिका तयार करण्यासाठी अर्ज दाखल करावेत

 

लातूर,दि.24 ( जिमाका ):- विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांच्याकडून बहूराज्यीय सहकारी संस्था अधिनियम,2002 चे कलम ८४ (४) अन्वये सन 2022-2025 या कालावधीसाठी लवाद नामतालिका तयार करण्यासाठी पुढील व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे लातूर सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक सचिन रावल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सर्व न्यायालयातील निवृत्त न्यायाधिश व सेवानिवृत्त विधी अधिकारी, प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेटस, चार्टड अकौन्टंट, कॉस्ट अकौन्टंट, राष्ट्रीय बँका, ग्रामीण बँका, भूविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका याच्या सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी                    ( ज्यांना सेवानिवृत्त होवून दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे.) सहकार विभागातील उपनिबंधक दर्जापेक्षा वरच्या दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी ( ज्यांना सेवानिवृत्त होवून दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे.)

तसेच अशा व्यक्तींची नियुक्ती करतांना उक्त अधिनियमामध्ये नमूद नसले तसेच पुढीलप्रमाणे जादा आर्हता / पात्रता असाव्यात. त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय / बँक सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी व सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. अशी व्यक्ती कोणत्याही काळ्या यादीमध्ये समाविष्ट नसावी. सदर व्यक्ती संबंधित विभागाच्या असावा. ( लातूर, उस्मानाबाद, बीड व नांदेड जिल्ह्यातील) सदर व्यक्ती एकावेळी एकाच विभागातून अर्ज दाखल करु शकते.

अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग, लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दूसरा मजला, शिवाजी चौक, लातूर ता. जि. लातूर यांच्या कार्यालयात दिनांक 1 डिसेंबर, 2021 ते दिनांक 31 डिसेंबर, 2021 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 डिसेंबर, 2021 पर्यंत राहील. प्राप्त अर्जाची छाननी करुन दिनांक 14 फेब्रुवारी, 2022 रोजी प्रारुप लवाद नामताकलिका प्रसिध्द होईल. सदर प्रारुप नामतालिका यादी संबंधित विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात लावण्यात येईल. प्रारुप नामीकेवर हरकती असल्यास drcslaw@gmail.com या ई-मेलवर पुराव्यासह हरकती दिनांक 21 फेब्रुवारी, 2022 पर्यंत सादर कराव्यात. हरकतीचा निर्णय करुन दिनांक दिनांक 18 मार्च, 2022 रोजी अंतिम लवाद नामतालिका प्रसिध्द करण्यात येईल. याबाबतची जाहीर सुचना उपरोक्त नमुद कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

0000      

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु