विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचर्या, वर्ग तीन व चार कर्मचा-यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण

 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील

डॉक्टर्स, परिचर्या, वर्ग तीन व चार कर्मचा-यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण

 

          लातूर,दि.24-(जिमाका)- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातुर येथे अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले. अधिष्ठाता यांच्या सुचनेनुसार सदरील अग्निसुरक्षा प्रशिक्षण हे रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचर्या व इतर कर्मचाऱ्या करिता आयोजित करण्यात आले होते.

       याकरिता लातुर शहर महानगरपालिके मार्फत आयोजित प्रशिक्षणामध्ये  अग्निशमन अधिकारी जाफर शेख, आनंद शिंदे, राधाकिशन कासले व टिम यांच्याकडून उपस्थिताना आग लागल्यानंतर विजविण्या करिता प्रशिक्षण देण्यात आले. तसेच आगीचे कारण (जळणारी वस्तु, हवा आणि उष्णता) या गोष्टी एकत्रित आल्यामुळे आग लागते. आगीचे प्रकार जसे की, भरीव वस्तुला लागलेली आग, द्रव्य पदार्थांना लागलेली आग, वायुला लागलेली आग, धातुची आग किंवा विद्युत प्रवाहाची आग याबद्दल माहिती देवून या प्रकारच्या आग विजवण्याकरिता माहिती देण्यात आली. तसेच याकरिता लागणारे उपकरण अग्निशमन कुपी व त्यांचे प्रकार जसे की, ABC & CO2 गरजेनुसार कोठे वापरावयला पाहिजे याबाबतची माहिती दिली. या कुपी कशा प्रकारे हाताळल्या पाहिजेत याकरिताचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.

             या प्रशिक्षणाकरिता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता, डॉ. सुधीर देशमुख,  वैद्यकीय अधिक्षक संतोषकुमार डोपे, उप अधिष्ठाता डॉ. मंगेश सेलुकर, उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कानडे,  अधिसेविका श्रीमती अमृता पोहरे, स्वच्छता निरीक्षक, रुग्णालयातील ईतर वर्ग तीन व चार कर्मचारी व सुरक्षा रक्षक उपस्थित होते. या प्रशिक्षणाकरिता परिचर्या महाविद्यालयाचे 40 विद्यार्थी, परिसेविका 20, अधिपरिचारीका 100, डॉक्टर्स 150,  वर्ग चार कर्मचारी 200, सुरक्षा रक्षक  50 यांना प्रशिक्षण देण्यात आले.



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु