जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारांसाठी 2 डिसेंबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन
जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारांसाठी
2 डिसेंबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन
लातूर,दि.26(जिमाका):-
कोशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातंर्गत
मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर
येथे दिनांक 2 डिसेंबर, 2021 रोजी जिल्हास्तरीय, शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यास लातूर, स्थानिक व पुणे एसएमपी सर्व्हिसेस प्रा.लि.
भोसरी पुणे, प्रभा इजिनिअरींग प्रा. लि. , वेलमेड लूकींग सिस्टीम प्रा. लि. , मरेली
टालब्रोस क्लासेस सिस्टीम प्रा. लि., याझाकी इंडिया प्रा. लि. या कंपन्या उपस्थित राहणार
आहेत.
आयटीआय / एमसीव्ही उत्तीर्ण व्यवसाय फिटर ,
मोटार मेकॅनिक, शीट मेटल, टर्नर , वेल्डर, आर. ए. सी , विजतंत्री ओएमटी, विजती, इलेक्ट्रॉनिक्स
ॲटोमोबाईल, इलेक्ट्रिशिएन इलेक्ट्रीकल मेकानिक भरती मेळाव्यास येतांना सोबत दहावी,
बारावी मार्कशिट, आयटीआय, एमसीव्ही मार्कशिट, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅनकार्ड
इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित व मुळ प्रती सोबत घेवून यावेत.
ज्या आयटीआय व एमसीव्हीसी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना
अद्याप शिकाउ उमेदवारी मिळालेली नाही, त्यांनी दिनांक २ डिसेंबर, २०२१ रोजी सकाळी 10-00
वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिवाजी चौक, लातूर येथे उपस्थित राहून शिकाउ उमेदवारी
भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्या, औद्योगिक प्रशिक्षण
संस्था लातूर यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment