शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थी व महाविद्यालयाच्या बँक खात्यावर जमा होण्यासाठी दिलेल्या कारणांची पूर्तता करावी
शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थी व महाविद्यालयाच्या बँक खात्यावर
जमा होण्यासाठी दिलेल्या कारणांची पूर्तता करावी
लातूर,दि.30(जिमाका)- सन २०१८-१९ व २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची
व महाविद्यालयाची शिष्यवृत्ती अद्याप बॅंक खातेवर जमा न झालेल्या कारणांसह यादी
महाविद्यालयास देण्यात आली आहे तसेच महाविद्यालय लॉगीन मध्येही आहे. तरी महाविद्यालयानी सदर विद्यार्थ्यांशी तात्काळ संपर्क साधुन दिलेल्या कारणांची योग्य
ती पुर्तता तात्काळ करण्यात यावी अन्यथा सदर विद्यार्थी व महाविद्यालयाची शिष्यवृत्तीची
रक्कम जमा न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदरी महाविद्यालयाची व विद्यार्थ्यांची
राहील,असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,लातूर यांनी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
जिल्हयातील सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित/
विनाअनुदानित /कायम विनाअनुदानित महाविदयालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्ये
प्रवेश घेतलेल्या अनुसूचित
जाती, विमुक्त जाती
भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील
विदयार्थी यांना कळविण्यात येते की, सन 2018-19 या वर्षापासुन भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता
शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असलेल्या
विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेचे
अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी ही संगणक प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे.
या
अर्जांवर या कार्यालयाकडून महाडिबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन मान्यता प्रदान केल्यावर
आयुक्तालयस्तरावरुन (DDO)
त्यांचे देयके तयार करुन कोषागारातून देय असलेली रक्कम पारीत करुन महाडिबीटी
पोर्टलच्या Pool बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली
आहे. सदर देय असलेली रक्कम ही PFMS या केंद्रभूत
वितरण प्रणालीमधून विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बॅंक खात्यामध्ये
थेट महाडिबीटी प्रणालीद्वारे जमा होणे अपेक्षित आहे. तद्पूर्वी PFMS
प्रणालीमधून वितरण करण्यापूर्वी लाभार्थ्यांचे आधार क्रमांक
बॅंक खात्यास संलग्न असल्याचे NPCI या
केंद्रभूत पडताळणी प्रणालीतून मान्य झालेल्या पात्र लाभार्थ्याचे आधार व बॅक
खात्याची पडताळणी करण्यात येते.
याशिवाय,
देयक जनरेट झालेल्या अर्जापैकी ब-याच विद्यार्थ्याच्या खात्यात
शिष्यवृत्तीचे वितरण सद्यस्थितीत महाडीबीटी प्रणालीवरील (Pool account)
व PFMS या प्रणालीद्वारे चालू
असून सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीची रक्कम
आधार संलग्न बॅंक खात्यात अद्याप जमा व्हावयाची आहे.
सदरील
रक्कम पीएफएमएस प्रणालीद्वारे वितरीत होण्यास पूढील कारणांमुळे विलंब होत आहे.
नॉन आधार अर्ज नोंदणी केलेल्या अर्जांमध्ये
आधारक्रमांक अद्यावत नसणे. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या
बॅंक खात्याशी संलग्न नसणे. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक इनअॅक्टीव्ह
असणे. विद्यार्थ्यांनी व्हाऊचर रिडीम न करणे. विद्यार्थ्यांचे आधार संलग्न असलेले बॅंकेतील खते बंद असणे. विद्यार्थ्यांचे आधार संलग्न मोबाईल क्रमांक बंद असणे. दुस-या हप्त्यासाठी
महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची उपस्थिती अद्यावत करण्याकरीता अर्ज
प्रलंबित असणे.
वरील
सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या आधार व बॅंक खात्याशी निगडीत असून त्या त्यांच्या
स्तरावरुन जसे जसे अद्यावत केले जाईल त्याप्रमाणे विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीची
रक्कम त्याच्या बॅंक खात्यात आपोआप जमा होणार असल्याचे महाडिबीटी पोर्टलचे
तांत्रिक कक्ष व राज्य शासनाचे माहिती व तंत्रज्ञान संचालनालय यांनी शासनास
कळविले आहे.
****
Comments
Post a Comment