शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण 15 नोव्हंबर पर्यंत पुर्ण करुन घ्यावे --- सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, रेणापूर यांचे आवाहन
शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण
15 नोव्हंबर पर्यंत पुर्ण करुन घ्यावे
--- सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, रेणापूर यांचे आवाहन
लातूर,दि.10,(जिमाका):- रेणापूर
तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, तालुक्यात 2019 पासून सुरु असलेल्या
महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 योजनेमध्ये 6 हजार 408 शेतकऱ्यांनी
43.34 कोटींचा लाभ मिळाला असून आधार प्रमाणिकरणासाठी 15 नोव्हेंबर 2021 ची डेडलाईन
देण्यात आलेली आहे.
राज्य शासनाकडून दोन लाखापर्यंत कर्जमुक्ती
ही योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये ताललुक्यातील 6 हजार 717 शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिध्द झालेली आहे.यातील
6 हजार 611 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण पुर्ण केलेले असून 6 हजार 408 शेतकऱ्यांना
43.34 कोटी रकमेचा कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे.मात्र विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिध्द
झाल्यानंतरही 111 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पुर्ण केलेले नाही.
आधार प्रमाणिकरण करणे बाबतची शेतवटची तारीख
15 नोव्हेंबर 2021 दिलेली आहे. या तारखेपर्यंत प्रमाणीकरण पुर्ण न केल्यास कर्जमुक्ती
योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. त्यामुळे 111 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण जवळच्या आपल्या
सेवा केंद्रास जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. तसेच काही अडचणी आल्यास सहाय्यक निबंधक,
सहकारी संस्था, रेणापूर, जिल्हा परिषद शाळा,
मेन रोड, रेणापूर कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था,
रेणापूर आर.एल. गडेकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
****
Comments
Post a Comment