मौजे टाकळगाव येथे आज रोजी कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

 

मौजे टाकळगाव येथे आज रोजी

कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

 

       लातूर,दि.9,(जिमाका):- टाकळगाव येथे कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन गावच्या सरपंच सौ. अहिल्या संजय शिंदे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावचे उपसरपंच देवणे केदारी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून पॅनल अॅड. छाया मलवाडे आणि विधीस्वयंसेवीका सौ. पार्वती सोमवंशी या उपस्थित होत्या.

       कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन मोरे एल. एम. यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. अहिल्या संजय शिंदे यांनी केले.

                    या शिबीरामध्ये पॅनल अॅड. छाया मलवाडे यांनी ज्येष्ठ नागरिकांचा कायदा, महिलांचे अधिकार, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाओ बेटी पढाओ व विधी सेवा प्राधिकरण इ. विषयी माहिती दिली. कायद्याचे अज्ञान हा बचाव होवु शकत नाही म्हणुन तळागाळातील लोकांना कायद्याचे ज्ञान असणेही गरजेचे आहे. त्याचबरोबर महिलांचे सक्षमीकरण होणे ही काळाची गरज आहे हे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आवर्जुन सांगितले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्याबद्दल ही त्यांनी सांगितले. तसेच विधीस्वयंसेवीका सौ. पार्वती सोमवंशी यांनी मनोधैर्य योजना, शासकिय योजना व बचतगटाच्या गृहउद्योग याविषयी सविस्तर अशी माहिती समस्त गावकऱ्यांना दिली. यात यांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे बचतगटाच्या माध्यमातुन होवू शकते त्यासाठी महिलांनी आपल्या अधिकारांचा वापर करुन प्रगती करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

       या कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व गावातील समस्त गावकरी उपस्थित होते.

        तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील पॅनल अॅडव्होकेट आणि गावातील सरपंच यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला. 

 

                                                      



                                                                            

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु