हिसोरी, खंडाळा येथे कायदेविषयक जनजागृती अभियान संपन्न

 

                                      हिसोरी, खंडाळा येथे

कायदेविषयक जनजागृती अभियान संपन्न

                लातूर,दि.12 (जिमाका):- हिसोरी, खंडाळा येथे कायदेविशयक जनजागृती अभियान पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन पॅनल अॅड. छाया मलवाडे आणि विधी स्वयंसेविका सौ. पार्वती सोमवंशी या उपस्थित होत्या. हिसोरी येथे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यंकट आंबादास ठोंबरे होते. तर खंडाळा येथील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून दगडूबाई नामदेव गरड हे होते.

            या दोन्ही कार्यक्रमात कायदेविषयक मा
र्गदर्शन करताना पॅनल अॅड. छाया मलवाडे यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ, शिक्षणाचा अधिकार, महिलांचे हक्क व अधिकार, ज्येष्ठ नागरिकांचा कायदा व विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्याबद्दल माहिती दिली. मोफत शिक्षणाचा अधिकार, मुलींच्या शिक्षणाचे महत्व तसेच महिलांवर होणारे अत्याचार व त्यांचे विविध अधिकार तसेच ज्येष्ठ नागरिकांची होणारी कुचंबना व अवहेलना यासाठी ज्येष्ठ नागरिक कायदा कसा मदतीचा ठरु शकतो व विधी सेवा प्राधिकरण तर्फे मोफत सहाय्य कोणाला व कसे मिळवता येऊ शकते हे त्यांनी सांगितले. सर्वांना कायद्यांचे थोडेफार प्रमाणात ज्ञान असणे काळाची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. बऱ्याच वेळा कायद्याचे ज्ञान नसल्याने आपल्या हातून अनावधानाने गुन्हा घडतो  तर आपल्याकडून असे होवू नये, असे ही त्या म्हणाल्या. तसेच आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात आपण विधी सेवा प्राधिकरणामार्फत न्याय मागू शकतो असे त्यांनी सांगितले.

           


तसेच विधी स्वयंसेविका सौ. पार्वती सोमवंशी यांनी मनोधैर्य योजना व विविध शासकीय योजनांची सखोल माहिती व मार्गदर्शन केले. हिसोरी येथिल कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन राजाभाऊ सोमवंशी यांनी केले व आभार प्रदर्शन रमेश शिंदे यांनी केले. तसेच खंडाळा येथील कार्यक्रमाची प्रस्तावना व  सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अक्षय झाडके यांनी केले.

            या कार्यक्रमास हिसोरी व खंडाळा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावातील गावकरी  उपस्थित होते.

            तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील पॅनल अॅडव्होकेट आणि उपरोक्त गावातील सरपंच व ग्रामसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु