छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत 27 व 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन

 

छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत

27 व 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन

        लातूर,दि.26 (जिमाका) :-  भारत  निवडणूक आयोग, नवी दिल्ली  व मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य , मंत्रालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला असून त्यानुसार दिनांक 1 नोव्हेंबर, 2021 ते 30 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत दावे व हरकती स्विकारणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदार नोंदणी प्रभावीपणे कालावधीत दावे व हरकती स्विकारणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदार नोंदणी प्रभावीपणे होण्यासाठी दिनांक 27 व 28 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत असून या विशेष मोहिमेच्या कालावधीत मतदान केंद्र स्तरीय अधिकारी बीएलओ पूर्ण वेळ मतदान केंद्रावर हजर राहणार आहेत.

       लातूर तालुक्यातील सर्व नागरिकांना / मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत नाहीत व ज्यांचे वय दिनांक 1 जानेवारी, 2022 रोजी 18 किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांनी दिनांक 1 नोव्हेंबर, 2021 ते दिनांक 30 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत दिनांक 27 व २८ नोव्हेंबर, 2021 या विशेष मोहिमेच्या कालावधीत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. मतदारांचे नाव दुरुस्ती करावयाचे आहे. किंवा ठिकाण / पत्ता बदलावयाचे आहे. तसेच मयत व कायम स्थलांतरीत झाल्यामुळे मतदार यादीतील नावांची वगळणी करावयाचे आहे. त्यांनी योग्य तो नमुना अर्ज ऑनलाईन स्वरुपात www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline App च्या माध्यमातून अर्ज सादर करावे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत वरील सर्व अर्ज हस्तलिखित स्वरुपात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बीएलओ) यांच्यामार्फत स्विकारले जाणार आहेत. मतदारांनी / नागरिकांनी पुढीलप्रमाणे योग्य तो नमुना अर्ज सादर करावेत.

       ज्यांचे नाव मतदार यादीत नाही व ज्यांचे वय दिनांक 1 जानेवारी, 2022 रोजी किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांच्यासाठी अर्जाचा नमुना नं. 6 व अर्जदाराचा रंगीन फोटो, जन्म तारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा ही कागदपत्रे  आवश्यक आहेत.

      मयत किंवा कायम स्थलांतरीत असल्यास त्यांच्यासाठी अर्जाचा नमुना नं. 7 व मयत- मृत्यू प्रमाणपत्र, स्थलांतरीत- सद्या राहत असलेल्या वास्तव्याचा पुरावा ही कागदपत्रे आवश्क आहेत.

        मतदार यादीतील तपशिलात दुरुस्तीसाठी अर्ज नमुना नं. 8 व ज्या तपशिलात दुरुस्ती करावयाची आहे , त्यासंबंधीचा पुरावा ही कागदपत्रे आवश्कय आहेत.

        विधानसभा मतदार संघातंर्गत ठिकाण / पत्ता बदल करण्यासाठी अर्ज नमुना नं. 8-अ व अर्जदाराचा रंगीन फोटो , रहिवासी पुरावा ही कागदपत्रे आवश्कय आहेत.

      मतदार नोंदणी प्रभावीपणे होण्यासाठी तहसील कार्यालय, लातूर अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने नवमतदार म्हणून विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी होण्यासाठी दयानंद महाविद्यालय, लातूर यांना व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांना या कार्यालयाकडून मतदार नोंदणी शिबीर आयोतित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार या महाविद्यालयाने नव विद्यार्थी मतदारांची नोंदणी कार्यक्रम आयोजित केल्याबाबत या कार्यालयास अवगत केले आहे. तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

         मतदार नोंदणी प्रभावीपणे होण्यासाठी वंचीत घटक (दिव्यांग मतदार) यांच्यासाठी दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड, लातूर येथे दिनांक 27 नोव्हेंबर, 2021 रोजी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दिव्यांग मतदारांनी याचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात येत आहे.

      मतदार नोंदणी प्रभावीपणे होण्यासाठी वंचीत घटक ( देह विक्रय करणाऱ्या स्त्रिया) याच्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, लातूर यांच्यामार्फत मतदार नोंदणीसाठी दिनांक 27 व 28 नोव्हेंबर, 2021 रोजी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. वंचीत याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

         कोविड -19 चा प्रादुर्भाव व मतदार यादीतील त्रुटी टाळून अर्जांचे संगणीकरण सोयीचे होण्यासाठी मतदार नोंदणी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास भारत निवडणूक आयोगाचे www.nvsp.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline App मध्ये सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. या सुविधांचा जास्तीत - जास्त व प्रभावीपणे वापर करुन ऑनलाईन अर्ज करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, लातूर सुनील यादव, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, औसा-रेणापूर व तहसीलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी, अविनाश कांबळे यांनी केले आहे.

      अधिक माहितीसाठी www.nvsp.in , https://ceo.maharashtra.gov.in, Voter Helpline App या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे सहा. मतदार नोंदणी अधिकारी तहसीलदार यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा