पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबर 2021 पर्यत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे - सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांचे आवाहन

 

पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबर 2021 पर्यत

आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे

- सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांचे आवाहन

 

           लातूर,दि.11 (जिमाका):-    महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2019 अंतर्गत लातूर जिल्ह्यात 57 हजार 393 लाभार्थ्यांच्या कर्ज खाती एकुण 338.43 कोटी रुपये जमा झालेले आहेत. मात्र अद्याप 1 हजार 749 लाभार्थ्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या कर्जाच्या लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेली नाही. तरी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबर 2021 पर्यत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांचे समृत जाधव यांनी आवाहन केले आहे.

          शासनाने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना-2019 या योजनेअंतर्गत कर्ज मुक्ती देण्याची योजना केली होती. जिल्ह्यातील 60 हजार 373 कर्ज खाती विशिष्ट क्रमांकासह योजनेच्या पोर्टलवर प्रसिध्द झाली आहेत. पैकी 58 हजार 624 लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घेतले आहे. आधार प्रमाणिकरण झालेल्या कर्जखात्यापैकी 57 हजार 393 लाभार्थ्यांच्या कर्ज खाती एकुण 338.43 कोटी रुपये जमा झालेले आहेत. मात्र, अद्याप 1 हजार 749 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी त्याचे आधार प्रमाणिकरण करुन घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्या कर्जाच्या लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही.

        तरी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबर, 2021 पर्यंत त्यांच्या आधार प्रमाणिकरणासाठी संबंधीत बँक शाखा, विविध कार्यकारी सोसायट्या आणि तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे संपर्क करावा. तसेच आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. अन्यथा सदरची योजना शासनाकडून बंद करण्यात आल्यास त्या नुकसानीची परिणामांची जबाबदारी व्यक्तीगतरित्या संबंधीत लाभार्थ्यांची राहील, असे लातूर सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

                                                              ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु