राष्ट्रीय युवा पुरस्कार 2019-20 साठी 19 नोव्हेंबर पुर्वी अर्ज करण्याचे आवाहन
राष्ट्रीय युवा
पुरस्कार 2019-20 साठी 19 नोव्हेंबर
पुर्वी अर्ज करण्याचे
आवाहन
लातूर, दि.16 (जिमाका):- युवा विकासाचे
कार्य, आरोग्य क्षेत्रातील नवीन उपक्रम व संशोधन, संस्कृती, मानवी हक्कांबाबत कार्य,
कला व साहित्य, पर्यटन, पारंपारिक औषधे, सक्रीय नागरीकत्व, सामाजीक सेवा, क्रीडा व
शिक्षण क्षेत्रातील श्रेष्ठता व अद्यावत शिक्षण इ. क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या
युवकांना केंद्र शासनाच्या वतिने “राष्ट्रीय युवा पुरस्कार” देऊन गौरविण्यात
येते.
सन 2019-20 या वर्षाच्या पुरस्कारासाठी
पात्र युवक व युवतींकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील युवक
व युवतींनी केंद्र शासनाच्या https://innovate.mygov.in/national-youth-award-2020 या लिंकवरुन
दि. 19 नोव्हेंबर, 2021 पुर्वी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी, लातूर यांनी
केले आहे.
ऑनलाईन अर्ज करणाऱ्या युवक व युवतींनी ऑनलाईन
सादर केलेल्या प्रस्तावांच्या दोन प्रती जिल्हा क्रीडा अधिकारी, लातूर यांच्या कार्यालयात
सादर कराव्यात म्हणजे त्यांचे अर्ज राज्यस्तर समितीच्या शिफारशीसह केंद्र शासनास सादर
करणे सोयईचे होईल असे जिल्हा क्रीडा अधिकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले
आहे.
****
Comments
Post a Comment