केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा लातूर जिल्हा दौरा

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

     नितीन गडकरी यांचा लातूर जिल्हा दौरा   

लातूर,दि.24 ( जिमाका ):- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे गुरुवार, दि. 25 व शुक्रवार, दि. 26 नोव्हेंबर, 2021 या दोन दिवसाच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

गुरुवार, दि. 25 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 9-45 वाजता नागपूर विमानतळावरुन विशेष विमानाने सकाळी 10-30 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन. 10-50  मोटारीने एम.आय.डी.सी. लातूर येथील कार्यक्रमास उपस्थिती. 11-00 वाजता विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन ॲन्ड रिसर्च सेंटर, लातूर येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.

दुपारी 1-00 वाजता मोटारीने औसा तालुक्यातील लोदगा ता. औसाकडे प्रयाण. दुपारी 1-30 ते दुपारी 2-00 वाजेपर्यंत लोदगा ता. औसा येथे राखीव. 3-00 वाजता लोदगा ता. औसा जि. लातूर येथील ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर ॲन्ड रिसर्च इनस्ट्यिुटच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. 3-30 वाजता मसलगा ता. औसा जि. लातूरकडे प्रयाण. 4-00 वाजता मसलगा ता. औसा जि. लातूर येथील पुलाची पाहणी कार्यक्रमास उपस्थिती. 4-30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, टाऊन हॉल लातूर येथील विविध कामांच्या भुमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.

सायंकाळी 5-45 वाजता एमआयडीसी लातूर येथील स्वयंसिध्दा महिला मंडळाच्‍या कार्यक्रमास उपस्थिती. 6-30 वाजता छत्रपती शाहू महाराज विद्यालय, लातूर येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्‍या कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 7-15 वाजता एमआयटी मेडिकल कॉलेजजवळ, अंबेजोगाई रोड, लातूर येथील  आमदार रमेशअप्‍पा कराड यांच्‍या निवासस्‍थानी भेट. 7-45 वाजता ग्रँन्ड हॉटेलच्या पाठीमागे, पाखरसांगवी रोड, सुप्रिया निवास येथील खासदार सुधाकर शृंगारे यांच्‍या निवासस्‍थानी भेट. 8-15 वाजता शासकीय विश्रामगृह, रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ, औसा रोड, लातूर येथील हॉटेल न्‍यु गंधर्व गार्डनच्या उद्धाटन कार्यक्रमास उपस्थिती. 8-45 वाजता एल.आय.सी. कॉलनी, रिंगरोड, लातूर येथील आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी भेट.

शुक्रवार, दि. 26 नोव्‍हेंबर, 2021 रोजी सकाळी 7-30 वाजता लातूर येथील विशाल नगरजवळील, चिरंजीव क्लिनीकसमोरील आमदार अभिमन्‍यू पवार यांच्‍या निवासस्‍थानी भेट. 8-00 वाजता विशाल नगर, लातूर येथून लातूर मोटरीने विमानतळाकडे प्रयाण आणि 8-15 वाजता लातूर येथून विशेष विमानाने दिल्‍लीकडे प्रयाण करतील.

0000  

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा