आजादी का अमृत महोत्सवानिमित्त येथे येत्या 14 नोव्हेंबरला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत शिबीराचे आयोजन

 

          आजादी का अमृत महोत्सवानिमित्त येथे येत्या 14 नोव्हेंबरला

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत शिबीराचे आयोजन

 

          लातूर,दि.1 (जिमाका) :-  सर्वसामन्य नागरिकांना शासकीय विभाग विविध योजनांच्या माध्यमातून सेवा पुरवित असतात. या विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना व्हावी त्यातून नागरिकांना लाभ व्हावा म्हणून येत्या दिनांक 14 नोव्हेंबर, 2021 रोजी विधी सेवा शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. यात सर्व विभागांनी आपआपल्या विभागांतर्गत योजनांच्या माहिती तसेच या शिबीराच्या अनुषंगाने नागरिकांना देण्यात येणार आहे, असे मा. न्यायाधिश प्र. जिल्हा  विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. ए. ए. शेख यांनी आवाहन केले.

            मा. सर्वोच्च न्यायालय व मा. महाराष्ट्र  राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार महेश परांडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, लातूर पाटबंधारे विभाग क्र. २ चे उपकार्यकारी अभयंता, आदि विविध विभागांच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.  

         दि. 02 ऑक्टोबर 2021 ते दि. 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत दिनांक 14 नोव्हेंबर, 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृह, लातूर येथे विधी सेवा शिबीराचे आयोजन सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.

         मा. न्यायाधीश प्र. जिल्हा  विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. ए. ए. शेख बैठकीत मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विविध शासकीय विभागांमार्फत शासकीय योजनांचे स्टॉल लावून नागरिकांना थेट सेवांची माहिती पुरविण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबीरामध्ये सर्व विभागांनी त्यांच्या योजनांची माहिती दिनांक 10 नोंव्हेंबर, 2021 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास पुरविण्यात यावेत, असेही उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्याकडे सादर करण्यात यावेत, असेही श्री. ए.ए. शेख म्हणाले.      

                                                          

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा