आजादी का अमृत महोत्सवानिमित्त कोल्हे नगर व स्वयंसिध्दा महिला मंडळ, लातूर येथे कायदेविशयक जनजागृती शिबीर संपन्न

 

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त

 

कोल्हे नगर व स्वयंसिध्दा महिला मंडळ, लातूर येथे

कायदेविशयक जनजागृती शिबीर संपन्न

 

           लातूर,दि.12 (जिमाका):- कोल्हे नगर व स्वयंसिध्दा महिला मंडळ, लातूर येथे कायदे विषयक जनजागृती अभियान पार पडले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक अॅड. संतोश एस. वाघमारे (ममदे), अॅड.आर.के. चव्हाण, अॅड. रेहाना तांबोळी, अॅड. बालाजी कुटवाडे, अॅड. छाया मलवाडे, अॅड. ज्योति यावलकर व  सौ. पार्वती सोमवंशी विधी स्वयंसेविका हे उपस्थित होते.

           कोल्हे नगर येथे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आर. के. चव्हाण हे उपस्थित होते. या कार्यक्रमात अॅड. संतोश वाघमारे (ममदे) यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर तसेच ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार व मोफत बाल शिक्षण अधिकार या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. अॅड. रेहाना तांबोळी यांनी महिलांचे अधिकार व विधी सेवा प्राधिकरण या विषयी माहिती दिली. अॅड. आर.के. चव्हाण यांनी मध्यस्थांची भुमिका, महिलांचे अधिकार व विधी सेवा प्राधिकरण या विषयी मार्गदर्शन केले. तसेच अॅड. बालाजी कुटवाडे यांनी विधी सेवा प्राधिकरण कार्याबद्दल माहिती दिली.

            स्वयंसिध्दा महिला मंडळ, लातूर येथील कार्यक्रमात कायदेविषयक मार्गदर्शन करताना पॅनल अॅड. छाया मलवाडे यांनी महिलांसाठी भारतीय दंड संहितेतील तरतुदी, मोफत  व सक्तीचा शिक्षणाचा कायदा, महिलांचे अधिकर, बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयी माहिती दिली. तसेच अॅड. ज्योति यावलकर यांनी ज्येष्ठ नागरी कायदा व  सामाजिक बांधीलकी या विषयी माहिती देतांना ज्येष्ठ नागरिकांची होणारी कुचंबना व अवहेलना यासाठी ज्येष्ठ नागरिक कायदा कसा मदतीचा ठरु शकतो व विधी सेवा प्राधिकरण तर्फे मोफत सहाय्य कोणाला व कसे मिळवता येवू शकते हे त्यांनी सांगितले.

           तसेच विधी स्वयंसेविका सौ. पार्वती सोमवंशी यांनी मनोधैर्य योजना व विविध शासकीय योजनांची सखोल माहिती व मार्गदर्शन केले.

         कोल्हे नगर येथील कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन अॅड. संतोश वाघमारे यांनी केले व आभार प्रदर्शन संजय सुर्यवंशी यांनी केले. तसेच स्वयंसिध्दा महिला मंडळ, लातूर येथील कार्यक्रमाची प्रस्तावना व  सुत्रसंचालन अॅड. छाया मलवाडे व आभार प्रदर्शन अपर्णाताई बागले यांनी केले. सदरील कार्यक्रमास उपरोक्त ठिकाणचे नागरिक उपस्थित होते.

             तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर येथील पॅनल अॅडव्होकेट आणि उपरोक्त ठिकाणच्या कर्मचाऱ्यानी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.

                                                           



                                                                                                 

/-

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा