खेलो इंडिया युथ गेम्स खो-खो, कबड्डी,बास्केट बॉल जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन

 

खेलो इंडिया युथ गेम्स खो-खो, कबड्डी,बास्केट बॉल

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन

 

लातूर, दि.17 (जिमाका):- केंद्र शासनाच्या वतीने 4 थ्या खेलो इंडिया युथ गेम्स खो-खो, कबड्डी, बास्केट बॉल या खेळाचे आयोजन दि. 5 ते 14 फेब्रुवारी 2022 या कालावधीत, पंचकुला (हरियाणा) या ठिकाणी आयोजित करण्योच निश्चित केलेले आहे. या स्पर्धा 18 वर्षाखालील मुले व मुली वयोगटात आयोजित करण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे संघ निवडण्याकामी लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धाचे आयोजन करण्याचे निश्चित केलेले असून जिल्हास्तरावरील खो-खो व कबड्डी या खेळाच्या स्पर्धा अनुक्रमे दि. 22 व 23 नोव्हेंबर 2021 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथे तर बास्केटबॉल या खेळाच्या स्पर्धा दि. 25 नोव्हेंबर 2021 रोजी महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

जिल्हास्तरीय स्पर्धेतून विजयी संघ विभागीय स्पर्धेत सहभागी होईल व हरलेल्या संघातील उत्कृष्ट 5 खेळाडुंची पुढील स्तरावर निवड चाचणीसाठी केली जाईल कबड्डी या खेळासाठी वजन गट मुले 70 की.ग्रा. व मुली साठी 65 की.ग्रा. असेण आवश्यक आहे.

या स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन पूढील अटी व शर्ती नुसार होईल. सहभागी होणारा खेळाडू हा 0101/2003 रोजी किंवा त्या नंतर जन्मलेला असणे आवश्यक आहे.खेळाडूचे आधार कार्ड, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र व वर्षापुर्वी काढलेला जन्मदाखला (मनपा / ग्रामपंचायतचा असावा ) यापैकी किमान दोन कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता शाळा / क्लब यांच्या संघाना प्रवेश दिला जाईल व शाळाबाह्य तसेच संघातून सहभागी होऊ न शकणाऱ्या खेळाडुंना जिल्हास्तरीय निवडचाचणीसाठी प्रवेश दिला जाईल.

स्पर्धेत सहभागाकरीता ईच्छुक संघ / खेळाडूंनी दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5.00 वाजे पर्यंत विहीत नमुन्यातील प्रवेशीका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करणे आवश्यक राहील. या स्पर्धेत जिल्हयातील प्रशालेचे संघ / निवडचाचणीसाठी प्रशाला/ क्लब चे उत्कृष्ट खेळाडू सहभागी करावे जेणे करुन आपल्या जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडू / संघाला खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल या कामी अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत लोदगेकर यांचेशी मोबाईल्‍ क्रमांक 9420292155 संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

                                                 ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा