जिल्हयातील दिव्यांगासाठी मोफत आरोग्य तपासणी शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

 

जिल्हयातील दिव्यांगासाठी मोफत आरोग्य तपासणी

शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

लातूर,दि.24 ( जिमाका ):- समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर व सिध्दीविनायक प्रतिष्ठाण, लातूर यांच्या संयुक्त विद्यामाने उमंग ईन्सटीटयुट ऑफ ऑटीझम ॲन्ड मल्टीडिसॅबीलीटी रिसर्च सेंटर आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर दि. 03 डिसेंबर 2021 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये पूढील आजाराचे निदान व उपचार केले जातील.

ऑटीझम (स्वमग्नता), बहुविकलांगता, मतिमंदता बुध्दअंकमापन, मुलांतील अतिचंचलता, हात पाय वाकडे असणे,मुल अभ्यासात हुशार नसणे, मुलांचे लिहिण्या-वाचण्यातील दोष,मुले उशीरा चालणे व बोलणे, हात-पाय कमजोर असणे अशा प्रकारच्या दिव्यांगत्वार उपचार केले जाणार आहेत.

या शिबीरामध्ये विविध आजाराचे निदान व उपचार करण्यासाठी मेंदू विकार तज्ञ डॉ. प्रशांत उटगे, ह्दय विकार तज्ञ डॉ. नितीन येळीकर, कान-नाक घसा ता डॉ. शैला सोमाणी, डोळयांचे विकार तज्ञ, डॉ. उमेश भामकर, हाडांचे विकार व शस्त्रक्रिया तज्ञ प्रसिध्द डॉ. तरल नागडा, ज्युपीटर हॉस्पीटल, मुंबई यांची टिम तसेच जेनेटीक तज्ञ डॉ. गायत्री आय्यर हे उपस्थित राहणार आहेत. सदर शिबीराचे आयोजन उमंग ईन्सटीटयुट ऑफ ऑटीझम ॲन्ड मल्टीडिसॅबीलीटी रिसर्च सेंटर, नवनी कलेक्टर ऑफीसच्या पाठीमागे शासकीय कॉलनी, बार्शी रोड, लातूर येथे करण्यात येत असून लाभार्थ्यांनी या क्रमांकावर 02382-221999 व 9921696056 या क्रमांकावर संपर्क साधावा.

या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे तसेच समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे यांनी केले आहे.

 

                                                   ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु