राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकातून खाजगी वाहने लावून प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी
राज्य परिवहन महामंडळाच्या
बसस्थानकातून
खाजगी वाहने लावून प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी
लातूर,दि.10,(जिमाका):- राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी बेमुदत
संपावर गेल्यामुळे नागरीकांची गैरसोय होवू नये, यासाठी प्रस्तावित संपाच्या कालावधीत
प्रवाशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना विनिर्दिष्ट करणे आवश्यक आहे, असे शासनास
वाटल्याने गृह विभाग ( परिवहन ) यांचे दि. 8 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या अधिसुचना नुसार
मोटार वाहन अधिनियम 1988 (1988 चा 59) चे कलम 66 चे उपकलम 3 चा खंड (एन) अन्वये प्राप्त
अधिकाराचा वापर करुन, महाराष्ट्र शासन याव्दारे सर्व खाजगी प्रवाशी बसेस स्कूल बसेस,
कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवाशी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात
आलेली आहे.
त्यानुसार
वरील खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकामधून प्रवाशी
वाहतूक करण्यास संप / आंदोलन मागे घेईपर्यंत परवानगी देण्यात येत आहे, असे आवाहन लातूर
राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
****
Comments
Post a Comment