विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करुन याचा लाभ घ्यावा

 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करुन याचा लाभ घ्यावा

 

लातूर,दि.26 (जिमाका) :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातुर या संस्थेमध्ये दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी  दि. 3 डिसेंबर, 2021 रोजी जागतिक दिव्यांग दिन  अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख व वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्याचे आयोजित करण्यात येणार आहे.

दिनांक 30 नोव्हेंबर, 2021 रोजी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली                     दि.3 डिसेंबर, 2021 रोजीच्या जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्याकरिता पूर्व तयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीकरीता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातुर येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण सरकुंडे व वरिष्ठ लिपीक श्रीधर उरगुंडे उपस्थित होते.

          दिनांक 3 डिसेंबर, 2021 रोजीच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातुर येथील अस्थव्यंगोपचार शास्त्र विभागातून स्नायुबंध मोकळा करणे (Tendon Release), स्थायुबंध स्थलांतरीत करणे (Tendon Transfer), व्यंग (विकृती) सुधारणा Deformity Correction व नेत्रचिकित्साशास्त्र विभागातुन मोतीबिुद शस्त्रक्रिया, बुबूळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही नेत्रदात्याच्या उपलब्धतेनुसार करण्यात येतील.

         तरी नागरीकांनी दि. 1 डिसेंबर, 2021 पर्यंत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करुन याचा लाभ घ्यावा असे आवाहन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातुर या संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी केले आहे.

0000

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा